Saturday, July 27, 2024
Homeबातम्याविधी महाविद्यालयात अंनिस चा कार्यक्रम

विधी महाविद्यालयात अंनिस चा कार्यक्रम

डॉ .आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा मुंबई येथे अंनिस महाराष्ट्र द्वारे जादूटोणा व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 बाबत जनजागृती आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या कायद्यातील तरतुदींची माहिती व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची माहिती देताना दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.यशोधरा वराळे होत्या.

देवदासी प्रथेविरुद्ध लढाऊ वृत्तीने कार्य करणाऱ्या रणरागिनी नंदिनी जाधव यांनी या कायद्यातील विविध तरतुदी आणि कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मधुकर वारभुवन यांनी केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रो. सुभाष चंद्र, अंधश्रद्धा निर्मूलनवार्ता पत्राचे संपादक राजीव देशपांडे, अंनिस कार्यकर्ते भगवान रणदिवे, रमेश साळुंके, अनंत पवार , बेडेकर सर, पगारे सर आणि बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन पवार, संजय गमरे, जयेश सातपुते तसेच वडेराव इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८