Saturday, July 27, 2024
Homeलेखविनम्र, तत्पर डॉ निधी पांडे

विनम्र, तत्पर डॉ निधी पांडे

8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त काही आयएएस आयपीएस महिला अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
– संपादक

गेल्या 24 वर्षांत डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मार्फत मिशन आयएएस हा प्रकल्प आम्ही राबवीत आहोत. महाराष्ट्रातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावी हा या मागचा उद्देश आहे. या 24 वर्षात जवळपास शेकडो आयएएस, आयपीएस आयआरएस व राजपत्रित अधिकाऱ्यांना मी भेटलो. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते.

अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ.निधि पांडे हे असेच विनम्र व तत्पर व्यक्तिमत्व आहे. इतकी विनम्रता मी फार कमी लोकांमध्ये पाहिलेली आहे. खरं म्हणजे त्या इतक्या उच्च पदस्थ असून इतक्या विनम्रपणे व तत्परतेने वागतात त्यामुळे समोरचा माणूस भारावून जाणे स्वाभाविक आहे. त्यांची माझी भेट गतवर्षी झाली. आमच्या दरवर्षी मे महिन्यात संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे निमंत्रण देण्यास मी त्यांना देण्यास गेलो. सर्वात महत्त्वाचे मी एक कार्ड पाठवल्याबरोबर मॅडमनी मला आतमध्ये बोलावले. बसायला सांगितले. मी मिशन आयएएस त्यांना खूप कमी शब्दांमध्ये समजावून सांगितले आणि मी त्यांना स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे लेखी निमंत्रण देण्यासाठी उठून उभा राहिलो. तशाच मॅडम उभ्या राहिल्या. आणि उभे राहूनच त्यांनी निमंत्रण स्वीकारले. थोडा वेळ बोलल्यानंतर मी त्यांचा निरोप घ्यायला लागलो. तेव्हा मॅडम उभ्या राहून मला त्यांनी निरोप दिला. ही बाब आमच्या साहित्यिक हृदयाने टिपली.

एक उच्चपदस्थ अधिकारी पहिल्याच भेटीमध्ये आपली छाप पाडून जातो. त्यात डॉ. निधि पांडे मॅडम यांचा समावेश आहे. पुढे मला जाणे जमले नाही तर मी माझे सहकारी श्री मनोहर वासनकर यांना पांडे मॅडमकडे पाठवले. मॅडमने त्यांचे देखील चांगले स्वागत केले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी वासनकर सरांना दिला आणि सांगितले की आपण संपर्कात राहा. मी आपल्या शिबिराला नक्की येईल. या एक वर्षाच्या काळामध्ये मी निधि पांडे मॅडम यांना फार कमी वेळा भेटलो. एकतर मिशन आयएएसच्या कामानिमित्त मी सतत भारतात कुठे ना कुठे व्याख्याने देत फिरत असतो आणि अमरावतीला असलो की इतरही कामे असतात. पण विभागीय आयुक्तांकडे काम म्हटल्यानंतर मला उत्साह येतो. याचे कारण मॅडममध्ये असलेली तत्परता व हसतमुखता.

माझा प्रशांत भाग्यवंत नावाचा आयएएस करणारा विद्यार्थी आहे. तो अकोल्याचा राहणारा आहे .त्याची एक समस्या होती. मी ती घेऊन विभागीय आयुक्तांचे कार्यालय गाठले. मॅडमची भेट घेतली. मॅडमनी लगेच नागपूर अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन लावला आणि हे काम ताबडतोब झाले पाहिजे असा निरोपही दिला. त्यांची ही तत्परता इतक्या वेगाने काम करून गेली की प्रशांतचे काम होऊन गेले. कुठल्याही कामाच्या संदर्भात मी मॅडमला एसेमेस टाकला तर न चुकता मॅडम त्याचे उत्तर देतात.

परवाची गोष्ट आहे. डॉ. उल्हास संगई माझ्याकडे आले. त्यांना मॅडमला भेटायचे होते. मी उल्हास संगई यांना घेऊन मॅडमकडे गेलो. त्यांची भेट करून दिली. चर्चा झाली. मॅडम ड्रायव्हरला म्हणाल्या काठोळे सरांना घरी सोडून द्या. मी म्हणालो, मी जाईन. माझे घर जवळच आहे. मॅडम म्हणाल्या नाही मी सोडतेय तुम्हाला. मला वाटले एक विभागीय आयुक्त असलेल्या उच्च पदस्थ अधिकारी मला घरी सोडायला येणार हे खरंच सुखद आनंद देणारी गोष्ट होती. कार्यालयीन वेळ संपतच आली होती. मॅडम निघाल्या. सोबत मलाही येण्यास सांगितले. मॅडम त्यांच्या इंद्रप्रस्थ बंगल्यावर गेल्या. माझे आदरतिथ्य केले. अल्पोपहार व चहापाणी झाल्यानंतर त्या चालकाला म्हणाल्या, सरांना त्यांच्या घरी सोडून द्या. मी गाडीमध्ये बसायला लागलो. मॅडमचा गार्ड म्हणाला या बाजूने मॅडम बसतात. तुम्ही तिकडून पलिकडून बसा. पण दारापर्यंत आलेल्या मॅडम गार्डला म्हणाल्या सर याच बाजूने बसतील. किती हा मोठेपणा. स्वतःची जागा मला देताना किती मोठे मन लागते. त्या दिवशी ते मला कळलं.

आमच्या चर्चेत असं कळलं मॅडमच्या वडिलांचं दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. परंतु शासकीय कामामुळे मॅडम जाऊ शकत नव्हत्या. पण वडिलांच्या वाढदिवसाला नाही तर आपण अगोदर जाऊन येऊ म्हणून त्या लखनऊला जाऊन आल्या. वडिलांना घेऊन अयोध्येला राम मंदिरात गेल्या. त्या म्हणाल्या, सर मी एक सामान्य व्यक्ती म्हणून तिथे गेले. दर्शनासाठी लाईन मध्ये उभे राहिले. माझ्या पदाचा मी आयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही बडे जाव मी तिथे मिरवला नाही किंवा मला लगेच दर्शन पाहिजे असा आग्रही धरला नाही. मॅडमला मी म्हटले तुमच्या वडिलांचा उद्या वाढदिवस आहे. आपण काही काळजी करू नका. मी माझा माणूस पाठवतो. दुसऱ्या दिवशी सायंकाळी आमचे प्रतिनिधी लखनऊला मॅडमच्या घरी पोहोचले. त्यांचे वडील हे देखील आयएएस ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. अमरावती वरून आपल्यासाठी शुभेच्छा द्यायला कोणीतरी प्रतिनिधी पाठवला आहे हे पाहून त्यांना धन्य वाटले.

वडिलांनी केलेल्या सुसंस्कारामुळे मँडम इतक्या चांगल्या घडल्या. मँडमच्या चेह-यावर जी परिपक्वता व जे स्मीत हास्य आहे व कार्यालयीन काम करण्याची जी तत्परता आहे ती नोंद घेण्यासारखी आहे. अशा आमच्या कर्तव्यदक्ष सुस्वभावी विभागीय आयुक्त डाँ.निधि पांडे मँडम यांना जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

प्रा डॉ नरेशचंद्र कठोळे

— लेखन : प्रा.डॉ.नरेशचन्द्र काठोळे.
संचालक. मिशन आयएएस, अमरावती.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. डॉ निधी पांडे मॅडम चे कार्या फार मोठे आहे माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..

  2. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून IAS कर्तृत्वशालिनी महिलांचे चरित्र आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्याबद्दल प्रा.डॉ.नरेशचन्द्र काठोळे आणि देवेंद्र सरांचे विशेष अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८