ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे अध्यक्ष कवी हाशम इस्माईल पटेल लिखित “विश्वाचा आर्त गहिवर” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषद, छ.संभाजीनगर चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या शुभहस्ते मसाप शाखा लातूरच्या वतीने थाटात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळयाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार प्रा.डॉ. शेषराव मोहिते हे होते, तर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य
डॉ नागोराव कुंभार यांचा विशेष गौरव करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस (पुणे), ज्येष्ठ कवी प्रा.फ.म. शहाजिंदे, विलास सिंदगीकर, जळकोट (सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई) कवी हाशम पटेल, प्रा. मैनोद्दीन मुल्ला, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर, प्रा. जयद्रथ जाधव (समिक्षक, लातूर) आणि प्राचार्य डॉ दुष्यंत कटारे (आंबेडकरी विचारवंत, लातूर) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.
या प्रकाशन सोहळयाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे यांनी तर आभार प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यांनी मानले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून अनेक मान्यवर, रसिक आवर्जून उपस्थितीत होते. त्यात मसापचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर (उमरगा), प्रा.डॉ.रामचंद्र काळुंखे (छ. संभाजीनगर), ज्येष्ठ कवी रमेश चिल्ले, प्रा.डॉ. भास्कर बडे, योगिराज माने, नरसिंग इंगळे, देवदत मुंडे, रमेश हणमंते, सतिश सुरवसे, मारुती गायकवाड, विवेक सौताडेकर आदी मान्यवर लेखक-कवी उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यासाठी साहित्य रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800