मूळचे नागपूर निवासी पण सध्या ठाणे येथे राहणारे समीर एस. गुप्ते आणि रेणू गुप्ते यांची कन्या वैदेही इंटरनॅशनल अबॅकस अँड मॅथेमॅटिक्स असोसिएशन द्वारा थायलंडच्या पाथुमथनी येथे आयोजित केलेल्या “आंतरराष्ट्रीय गणित मानसिक अंकगणित स्पर्धा २०२३ थायलंडचा पंतप्रधान पुरस्कार” साठी आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी झाली होती.

१३ वर्षीय वैदेही ठाणे येथील ” न्यू हरिझोल स्कॉलर ” या शाळेत आठवीत शिकत आहे़.
G7 श्रेणीमध्ये तीला चौथा क्रमांक प्राप्त झाला असून तिने जगभरातील १२ राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत जगभरातून २५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. तीच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे़.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800