Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यशिदोरी

शिदोरी

आईबाबा आम्हा देती
संस्कारांची शिदोरी
आयुष्याच्या प्रवासात
नाही केली शिरजोरी..१

ज्ञानरूपी शिदोरीचा
दीपस्तंभ आयुष्यात
गुरूंप्रति कृतज्ञता
सदा असते मनात….२

शिक्षणाच्या शिदोरीने
जागला आत्मविश्वास
क्षितिजास हात टेकण्या
घेतला मनाने ध्यास…३

अनुभवांच्या शिदोरीने
मनी आली प्रगल्भता
संकटांवर स्वार होण्या
लागणारी निर्भयता…४

नानाविध शिदोऱ्यांनी
स्वप्ने झाली ती साकार
आयुष्याच्या संध्याकाळी
मम् चित्त निराकार…५

— रचना : डॉ दक्षा पंडित. अमेरिका. ह. मु. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments