रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयात नुकतीच पीएम -उषा अंतर्गत उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा “उद्योजकता विकास” या पुस्तकाचे लेखक डॉ.दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, उद्योजकता विकास, औद्योगिक वाढीसाठी, सूक्ष्म-लघु उद्योग वाढ, ग्रामीण व अविकसित भारतातील भागाचे विकासासाठी, महाविद्यालयांमधील तरुण-तरुणींना रोजगार निर्मिती व वाढ करता यावी, विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करणे, व्यवस्थापनाचे कौशल्य वाढविणे व त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी याचा उपयोग होईल ही उद्दिष्ट्ये सांगितली. तसेच उद्योजक, उद्योजकता व व्यवस्थापक यां मधील फरक समजावून सांगितला.
प्रमुख मार्गदर्शक श्री.मंगेश डफळे यांनी मजबूत उद्योजकाचा पाया समजावून सांगितला. तसेच उद्योजकतेच्या मूलभूत गोष्टी, प्रेरणादायी केस स्टडीज, जीवनावश्यक कौशल्ये, स्वप्न पाहणाऱ्यांचे आणि ते पूर्ण करणाऱ्यांचे नेटवर्क या मुद्द्यांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे समन्वयन सहाय्यक प्राध्यापक श्री अनिल कुमार यांनी, सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापिका कु.तृप्ती विचारे यांनी तर आभारप्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक श्री निरंजन चोकते यांनी केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800