श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना आणि कुल्लोळी नेत्रालय, सांगली-मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी नुकतेच नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल २२० हुन अधिक जण सहभागी झाले होते.

या शिबिरात नेत्र चिकित्सा आणि त्या सोबतच नागरिकांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. कुल्लोळी नेत्रालयाचे डॉ. कमार शेख, डॉ. अमित गणेशवडे, डॉ. सलमा सय्यद, ऋषीकेश कांबळे आणि समीर मुल्ला यांनी सर्व तपासण्या केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी कोकणच्या संस्कृती प्रमाणे सुपारीचे रोप देऊन त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या, अशी माहिती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना समिती कार्यक्रम अधिकारी सुमित चव्हाण यांनी दिली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800