मृत्यूचे प्रवेशद्वार हळूहळू दिसू लागले आहे. मी रांगेत उभा आहे. आत जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. कुणी म्हातारे, तरुण अगदी लहान मुले सुद्धा जाताना दिसत आहेत. तिथले द्वारपाल त्यांना भराभर आत सोडत आहे.
मला मात्र तो ‘रांगेतच थांबा’ असे खुणावत आहे. सांगतो आहे ‘तू तिथेच थांब, तुझे हृदय आम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुला आम्ही आत जाऊ देणार नाही. आत येणाऱ्या सगळ्यांची स्थिती हीच असते; त्यांच्या हृदयाने सांगितले तेव्हाच आम्ही त्यांना आत प्रवेश देतो.’
‘हृदयाची एक झडप तुझी धडधडते आहे; परंतु ते पूर्ण बंद होत नाही तोपर्यंत थांब. कदाचित तुझे इतर अवयव धडपड करतील, रागावून हातपाय आपटतील, तुला आडवे सुद्धा पाडतील, डॉक्टर त्यांच्या प्रयत्नांनी तुझे हृदय सुरळीत करण्याचा प्रयत्न करतील, पण ज्या दिवशी त्याची क्षमता संपेल तेव्हाच विना विलंब, एका क्षणाचीही वाट न बघता आमच्या महाद्वारातून तू आत येशील’.

आत मध्ये अतिशय सुंदर व सुखद वातावरण आहे. सगळा भावभावनांचा कल्लोळ मिटलेला असेल. चंदनाच्या सुगंधाचा दरवळ असेल. अमृताचे झरे वाहत असतील. भगवान विष्णू लक्ष्मीसह शेषनागावर विसावलेले आहेत. एका बाजूला बर्फाच्छादित कैलास पर्वत शिखरावर माता पार्वती सह शिव भगवान विराजमान आहेत. बाळगणेश आणि कार्तिकेयाच्या बाललीला बघत आनंदी होत आहेत. सभोवती नंदीसोबत शिवगण आहेत. सर्वच वातावरण आल्हाददायक आहे. एकदा तुझे नश्वर शरीर पंचमहाभुतात विलीन झाले की बाहेरील तुझे नातेवाईक, आप्तजन म्हणतील हा कैलासवासी झाला, वैकुंठवासी झाला. मुले मुली व इतर सुह्द खूप दुःख करतील. पण तुझ्या आठवणींना हृदयाच्या तळवटीत ठेवुन पुन्हा त्यांच्या जीवनाशी ते समरस होतील. कधीतरी तुला आठवुन सद्गदितही होतील. तू मात्र सुखी व आनंदाचा अनुभव घेशील.
ॐ शांती शांती होईल.

— लेखन : अशोक नागेश. येवला, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खरे आहे पण मन मानत नाही 😞😞
पचनी न पडणारे त्रिवार सत्य
Factual truth, but it is fact that one cannot digest factual truths.
That is the moment when man realises and experiences the bitter truth
सत्य आहे पण आम्ही पचवु शकणार नाही
जीवनाचे कटू सत्य
हृदयद्रावक सत्यता
अगदी जळजळीत सत्य