Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यसंस्कार

संस्कार

अशी कशी उगवते सांग गडे
कुठल्या संस्कारांचे गिरवते धडे |ध्रृ|

इंग्रजांची गुलामी मिटे अंधकार
तुज फॅशनचा जडला हाहाकार
मातृभाषेचे कसे विसरली धडे
कुठल्या संस्कारांचे गिरवते धडे ||१||

आई बाबा विसरला नात्यास आज
उष्टी चाखून कुसंगती चढे माज
जिव्हेत उष्मेचे भरी विषारी खडे
कुठल्या संस्काराचे गिरवते घडे ||२||

धृतराष्ट्रापोटी जन्मले ते कौरव
व्यर्थ गेले संस्कारी कुलाचे तांडव
पांडू पुत्र झुकले योगेश्वरा पुढे
कुठल्या संस्कारांचे गिरवते धडे ||३||

पुंड्या जाहला पुंडलिक तो लाडका
पांडुरंग भक्तीचा जागवीला तडका
उठ मर्दा संस्कृती गंध का नावडे?
कुठल्या संस्कारांचे गिरवते धडे ||४||

शोभा कोठावदे

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments