Friday, December 6, 2024
Homeयशकथासकारात्मक नयना गुंडे

सकारात्मक नयना गुंडे

मिशन आय ए एस चे जाळे आता संपूर्ण भारतभर पसरतआहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यात मिशन आय ए एस चे उपक्रम सुरू झालेले आहेत. केवळ एक रुपयात आयएएसचे प्रशिक्षण देणारी अमरावतीची मिशन आयएएस ही भारतातील एकमेव संस्था आहे. आणि मिशन आय ए एस ही संस्था मोठ्या होण्याचे कारण की जवळपास 350 आयएएस आयपीएस व राजपत्रित अधिकारी मिशन आयएएसमध्ये सहभागी आहेत. अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांपासून तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आयएएस, आयपीएस आयआरएस व राजपत्रित अधिकारी मिशन आयएएसमध्ये सहभागी आहेत

परवा मला आमच्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल शाखेतून फोन आला . देवरी म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त तालुका. या तालुक्यामध्ये आमची मिशनची शाखा आहे. श्री संजय गोविंद काशीवार सर ती शाखा सांभाळतात .ते श्री शिवाजी हायस्कूल मध्ये शिक्षक आहेत .ते म्हणाले, सर आमच्या देवरीच्या मिशन आय ए एस च्या विद्यार्थ्यांना एका चांगल्या आयएएस अधिकाऱ्याची भेट घ्यावयाची आहे.

खरं म्हणजे देवरी हा भाग महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेला भाग. आमच्या मिशन आयएएसमध्ये नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी आहेत. परंतु देवरीं ते नागपूर हे अंतर जास्त आहे म्हणून मी लगेच गोंदियाच्या जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे मॅडम यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे कारण हे महत्त्वाचे होते की त्यांनी आपल्या मुलीला लहानपणापासून आयएएसचे धडे देऊन तिला आयएएस करून दाखविले होते. आणि म्हणून अशा कर्तव्यशील, कर्तव्यतत्पर व चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याची भेट आमच्या मुलांना करून देणे गरजेचे होते .मी जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे मॅडम यांना फोन लावला. मॅडम सकारात्मक विचारसरणीच्या आहेत. त्यामुळे त्यांनी ताबडतोब होकार दिला .त्या म्हणाल्या ,मुलांना अवश्य पाठवा .मी भेटेल.चर्चा करेल आणि त्या मुलांना प्रोत्साहन देईल. मी लगेच देवरी येथे फोन केला .आमच्या मिशन आय ए एस चे विभागीय संचालक श्री संजय गोविंदराव काशीवार यांना सूचना दिली की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला भेटण्याची अनुमती दिलेली आहे. काशीवार सरांना तसेच त्यांच्या सहकारी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला . आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार,चर्चा करणार, फोटो काढणार ही त्यांच्यासाठी खरोखरच आनंदाची बाब होती.

ठरल्याप्रमाणे श्री काशीवार सर निवडक विद्यार्थ्यांना घेऊन गोंदियाला पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मॅडमनी अगोदरच अधिकाऱ्यांना सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. त्यामुळे या सर्व मुलांचे आनंदाने स्वागत करण्यात आले .सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बसविण्यात आले.मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांचा परिचय करून घेतला. आणि त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्याबरोबर ग्रुप फोटोही काढला आणि मॅडम म्हणाल्या तुम्ही खूप दुरून आलेले आहेत. नक्षलग्रस्त भागातील आहात. चला आपण सोबत जेवण करू या .मॅडमनी अगोदरच भोजनाची तयारी करण्याची व्यवस्था आपल्या अधिकाऱ्यांना देऊन ठेवली होती.सगळे विद्यार्थी गोंदियाच्या शासकीय विश्राम भवनात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सर्वांनी जेवण केले. आणि जेवण करताना काही प्रश्न उत्तरे झाली .काही चर्चा झाली आणि सर्व विद्यार्थी आनंदाने देवरीला परतले .

नयना गुंडे मॅडमच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल की, “जीतने वाले कोई अलग काम नही करते वें हर काम अलग ढग से करते है”! . नयना गुंडे मॅडमनी त्या मुलांना वेळ देऊन त्या मुलांना जेवण देऊन त्या मुलांना जे प्रोत्साहन दिले ते खरोखरच नोंदणीय आहे .

खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे इतके काम असते की त्यांना एवढा वेळ नसतो. पण व्हेअर देअर इज विल देअर इज वे.जिथे कुठे इच्छा आहे त्या ठिकाणी मार्ग आहे . नयना गुंडे मॅडमनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .प्रोत्साहन दिले . प्रेरणा दिली. आजही ते विद्यार्थी गुंडे मॅडमची आठवण काढतात . त्यांनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी दिलेले जेवण आजही त्यांच्या स्मरणात आहे.

परवा मी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. गुंडे मॅडमची बदली गोंदियावरून नाशिकला झाली होती. आदिवासी विभागात त्या आयुक्त म्हणून आल्या आहेत. मला ही बातमी कळताच मी लगेच नाशिक गाठले . गडकरी चौकातील आदिवासी आयुक्त कार्यालयात मी पोहोचलो. नयना गुंडे मॅडम कार्यालयातच होत्या. मी लगेच माझे विजिटिंग कार्ड पाठवलं. कार्ड आत पोहोचल्याबरोबर मॅडमनी मला आत मध्ये बोलावले .माझ्याबरोबर संस्कार प्रकाशनाचे माझे सहकारी व ज्युनिअर आय ए एस हा दुसऱ्या वर्गापासून प्रकल्प राबविणारे श्री ओमप्रकाश जाधव हे होते .तसेच आमचे दुसरे सहकारी श्री साठेसर हे पण सोबत होते .आम्ही मॅडमकडे गेलो. मॅडमनी आमचे मनापासून स्वागत केले. चहापान झाले .आम्ही मॅडमचे आमच्या मुलांना भरपूर वेळ दिल्याबद्दल आभार मानले. मॅडम म्हणाल्या अहो त्या मुलांना किती प्रेरणा मिळाली हे महत्त्वाचे आहे .मी माझा थोडा वेळ दिला .पण त्या थोड्या वेळातून खूप मुले जीवनामध्ये उभे राहतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला इतका वेळ दिलेला आहे तर ते l दिलेल्या सल्ल्याचें पालन करतील.मॅडम आता आपण नाशिकला आदिवासी आयुक्त झालेल्या आहेत . आपला हा प्रकल्प आपण संपूर्ण महाराष्ट्रात राबवू.. मॅडम मला म्हणाल्या,तुम्ही असे करा .आमच्या सगळ्या अपर आयुक्तांना भेटा. सगळ्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटा आणि लगेच हा प्रकल्प त्या त्या विभागात सुरू करा. त्यांनी आदेश देताच आम्ही नागपूरचे आदिवासी विभागाचे अपर आयुक्त श्री रवींद्र ठाकरेसाहेब यांना भेटून त्यांना मॅडमचा निरोप सांगितला.

श्री रवींद्र ठाकरेसाहेब हे माझे जुने मित्र. त्यांनी ताबडतोब हा प्रकल्प नागपूर विभागामध्ये राबविण्याचे ठरविले . त्यासाठी सर्वप्रथम आम्ही गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. आमचे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती श्री नंदूभाऊ नरोटे यांना मदतीला घेतले आणि पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये 137 कार्यक्रम स्पर्धा परीक्षेचे आम्ही आदिवासी विभागासाठी दिले. विशेष म्हणजे आम्ही या शाळांमधून कुठल्याही प्रकारचे मानधन ,प्रवास खर्च घेतला नाही .आज तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्याही आदिवासी शाळेमध्ये जाल, आदिवासी आश्रम शाळेमध्ये जाल किंवा अनुदानित आश्रम शाळेमध्ये जाल आणि विद्यार्थ्यांना विचाराल तुम्हाला काय व्हायचे आहे ? तर सर्वजण एक मुखाने सांगतील की आम्हाला कलेक्टर व्हायचं आहे .इतकी चांगली तयारी आम्ही त्या मुलांची करून घेतली.

गडचिरोलीनंतर आम्ही चंद्रपूर जिल्हा गाठला . तिथले आमचे मित्र माजी मुख्याध्यापक व शिक्षक सहकारी बँकेचे संचालक श्री संजय ठावरी हे मदतीला आले. आणि चंद्रपूर, गडचांदूर भद्रावती, वरोरा, कोरपणा या भागात विविध आदिवासी शाळांमध्ये कार्यक्रम घेतले आणि सर्व मुलांना मंत्र दिला मी आयएएस अधिकारी होणारच. विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली .जागृती केली. प्रोत्साहन दिले आणि स्पर्धा परीक्षेची त्यांची भीती त्यांच्या मनातून निर्माण झालेली ती काढून टाकली.

नयना गुंडे मॅडमनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवली की आम्ही पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला .अमरावतीचे अपर आयुक्त आदिवासी विभागाचे श्री सुरेश वानखडे साहेब आम्ही यांना भेटलो .त्यांना श्री नयना गुंडे मॅडम यांचा निरोप सांगितला .त्यांनी व उपायुक्त श्रीमती जागृती कुमरे मॅडम यांनी या कामात पुढाकार घेतला.त्यांनाही कल्पना आवडली .एक अमरावतीचा माणूस आदिवासी विद्यार्थ्यांना जागा करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे हे श्रीमती जागृती कुंमरे मॅडम यांना मनापासून आवडले . त्यांनी अमरावती शहरातील वार्डनची लगेच मीटिंग बोलावली आणि सगळ्यांना आदेश दिलेत की काठोळे सरांचा “मी आयएस अधिकारी होणारच” अर्थात स्पर्धा परीक्षा कार्यक्रम हा कार्यक्रम आपण लगेच आयोजित करावा .आदिवासी उपायुक्त त्यांनी सांगितल्यामुळे आणि बरेचसे वॉर्डन हे माझे विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी लगेच याला होकार दिला .आणि त्याच दिवसापासून अमरावती शहरातील सतरा वसतीगृहांमध्ये “मी आय ए एस अधिकारी होणारच” अर्थात स्पर्धा परीक्षा कार्यक्रम संपन्न झाला .

खरं म्हणजे याचे सगळे श्रेय श्रीमती नयना गुंडे मॅडम यांना द्यावे लागेल. त्यांनी जो सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला त्यामुळे आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना जागे करू शकलो आणि म्हणून त्यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल की ,”कौन कहता है कि आसमान मे सूराग नही होता …एक तो पत्थर तबियत से उछालो यारो”. असे विचारून आणि “कोशिश करने वालो की कभी हार नही होती, पंख होने से कुछ नही होता हौसलो से उडान होती है ,
साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना “.

आज अमरावती नागपूर औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये मिशन आयएएस स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता, प्रवास खर्च न घेता जी व्यापक जनजागृती करीत आहे ती निश्चितच मोलाची आहे .पण याचे सगळे श्रेय जाते ते नयना गुंडे मॅडम यांनाच. आदिवासी आयुक्त असलेल्या या सनदी अधिकाऱ्यांनी जर आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले नसते, आमच्या उत्साह वाढवला नसता तर कदाचित हा आमचा हा प्रकल्प यशस्वी झाला नसता. म्हणून आता जागतिक महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त आम्ही सुप्रसिद्ध सनदी अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या आयुक्त श्रीमती नयना गुंडे मॅडम यांना मनापासून मानाचा मुजरा करतो .

प्रा डॉ नरेशचंद्र कठोळे

— लेखन : प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. गुंडे मॅडम सारखे सनदी अधिकारी व काठोळे सरांसारखे ध्येयवेडे व्यक्तिमत्व या समाजात असल्यामुळेच लोकशाही व नीतीमूल्ये बळकट होण्यास वाव मिळतो.मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा….
    सचिन कळसे
    9637624343

  2. मिशन आय ए एस वाटलं गुंडे मॅडम यांचा लेख खूप प्रेरणादायी. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अजूनही आय ए एस बद्दल तेवढी जागरुकता नाही ही खेदाची बाब आहे
    मिशनच्या कार्यामुळे ती वाढो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !