सखा तू मायबाप तू जीवन स्तंभ तूच रे कान्हा
अपार तुझी वात्सल्य दृष्टी मजसाठी अमृत पान्हा
घेतलेस कुशीत ममतेने असे लाभली रम्य श्यामल छाया
सुखरूप ठेविले लेकरास भावे अप्रूपतेची निळी माया
या जन्मातून त्या जन्मात प्रवासाच्या बेड्या किती
आस एकच मनोहर संगे कसली न आता जीवा भिती
युगे बदलती लोक बदलती परि न बदले आनंद सागर
भेटावया निरागस मनास येतोच सदैव सर्व
सखा तू मायबाप तू जीवन स्तंभ तूच रे कान्हा
अपार तुझी वात्सल्य दृष्टी मजसाठी अमृत पान्हा
घेतलेस कुशीत ममतेने असे लाभली रम्य श्यामल छाया
सुखरूप ठेविले लेकरास भावे अप्रूपतेची निळी माया
या जन्मातून त्या जन्मात प्रवासाच्या बेड्या किती
आस एकच मनोहर संगे कसली न आता जीवा भिती
युगे बदलती लोक बदलती परि न बदले आनंद सागर
भेटावया निरागस मनास येतोच सदैव सर्वेश्वर.

— रचना: सौ. मनिषा पाटील. केरळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान कविता मनीषा👍⚘️
खुप छान लेख आहे जय श्री राम 🙏🙏