Saturday, June 14, 2025
Homeसाहित्यसांजवात

सांजवात

दूर सारुनी तमास
तेवतसे सांजवात
प्रकाशली स्रुष्टी सारी
देई शांती अतोनात…..१

सौम्य मंद तेलवात
रोज लावू सांजवेळी
दीप प्रज्वलीत होता
भय ना उरे अवेळी…..२

इवलीशी सांजवात
कार्य तियाचे महान
स्वतः जळत राहुनी
भवताल दीप्तिमान…..३

तेलवात उजळता
दारी चैतन्य शिंपण
अंतरात प्रकाशले
दिव्य प्रकाश किरण…..४

आयुष्याच्या सांजवेळी
भिवविती संध्याछाया
करू वंदन ज्योतीस
नुरे सारी मोहमाया…..५

— रचना : डॉ दक्षा पंडित. अमेरिका. ह.मु.मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?
शितल अहेर on हे असं कां होतं ?
शितल अहेर on पु ल स्मरण
अदिती साळवी...दूरदर्शन.. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे