समुद्र उधाणतोच
होऊ लाटांवर स्वार,
शांत होऊन उभे राहूया किनाऱ्यावर IIधृII
चिंता करण्याने काही न मिळते घरघर
चिंता टाळल्याने पुढील मार्ग होतो सुकर
येणाऱ्या आव्हानांना सामर्थ्ये जाऊया समोर II1II
भोग भोगून संपवावे लागती सांगे संत सार
प्राप्त परिस्थिती आपोआप जाते
काळ नियंत्रण ठेवू शकत नाही सर्व गोष्टींवर II2II
भावनांच्या आवेगा योग्य दिशेनं घालू आवर
सकारात्मक ऊर्जादी गोष्टींचा करू स्वीकार
वेळ दवडू नये उगा निरर्थक प्रश्नांवर II3II
काळजी करू नये, काळजी घ्यावी जरूर
भरती ओहोटी चालूच राहते निरंतर
उदार ऊमदेपण स्वीकार शिकवे सागर II4II
— रचना : अरुण गांगल. कर्जत- रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800