Saturday, July 27, 2024
Homeलेखसाथसंगत : आदर्श महिला मंडळ

साथसंगत : आदर्श महिला मंडळ

५/६ महिला एकत्र आल्या कि फक्त घर सासर ,संसार आणि खरेदी इतक्याच गप्पा मारतात असा एक समज आहे. तो जमाना गेला. आता बायका जमल्या की जगभरातल्या गोष्टींवर चर्चा करतात, काहीतरी भरीव कार्य करतात.

२१ वर्षांपूर्वी मुंबईतील विलेपार्ले येथील ६ जणींनी एकदा जमल्या असतांना ठरवले की, आपल्या भागात एक महिला मंडळ चालू करायचे ! इथल्या जवळच्या बायकांशी संवाद साधायचा, त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर तज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. मग त्यांनी सुरू केले मुंबईतील विलेपार्ले येथे साथसंगत मंडळ.
महिन्यातून एकदा, तिसऱ्या शनिवारी. सायंकाळी दीड तास.. माजी महापौर डॅा. रमेश प्रभूंनी त्यांच्या प्रबोधनकार क्रिडा संकुलातील एक हॅाल मंडळाला उपलब्ध करून दिला, इतरही सर्व प्रकारची मदत केली. छत्रपति शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या बॅनर खालीच मंडळ तिथे कार्यक्रम करते.

मंडळाने अनेक शिबीरं, वर्कशॅाप, घेतली. स्पर्धा घेतल्या, सहली काढल्या. गुढी पाडव्याच्या मिरवणुकीत, पार्ल्यातील अहिल्यादेवी मंडळातही सहभाग असतो. जवळच्या जेष्ठ नागरिकांना एक विरंगुळा, एकमेकींचा आधार मिळाला. अनेक तज्ञांनी येऊन विविध विषयावर भाषणे दिली. काहींनी इथे प्रथम सुरवात करून पुढे प्रगती केली. वृत् निवेदक दिपाली केळकर, प्रोफेसर रेखा दिवेकर, मुलाखातकार, निवेदक रेडिओ जॅाकी अनघा मोडक, जेष्ठ लेखिका माधवी कुंटे, अनुवादक सविता दामले, लेखिका स्मिता भागवत, महिला जज्ज बागेश्री पारिख अशा अनेक प्रसिध्द महिलांनी मंडळात येऊन मार्गदर्शन केले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देणारे हे मंडळ असून जवळपास १०० च्यावर सभासद आहेत.

मुंबईत जुलैमध्ये २००६ साली पावसानी हाहाःकार केला होता, तेव्हा मंडळाने ज्यांचे घरदार वाहून गेले, अशा जवळच्या लोकांना भांडी, धान्य गोळा करून कपडे दिले. कधी अशाच कार्यात पैशाची मदत केली. कॅन्सर पेशंटना मदत केली. या सर्व महिला एकत्र आल्या म्हणूनच समाजासाठी काम करू शकतात.

मंडळ आणखी एक गोष्ट करते ती म्हणजे गेली २० वर्ष पार्ल्यातील सर्व महिला मंडळं एकत्र येऊन मराठी गौरव दिन साजरा करतात.
या वर्षी सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम कलादालन, प्रबोधनकार ठाकरे संकुल, येथे संपन्न झाला.

दर वर्षी सौ. चित्रा मेहेंदळे एक विषय देतात. या विषयावर सारी महिला मंडळे आपापला कार्यक्रम सादर करतात. या वर्षीचा विषय होता, डॉक्टरांनी लिहिलेली पुस्तकं. कुशलतेने शल्यचिकित्सा करणारे हात जेव्हा तेवढ्याच कौशल्याने कागदावर फिरू लागतात तेव्हा त्या वाङ्मयाला साहित्यिकच नव्हे तर मानवी मूल्य ही प्राप्त होतात असा अनुभव साऱ्या श्रोत्यांना आला.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. चित्रा मेहेंदळे यांनी उपस्थितांचं स्वागत करून केली. सौ. वृषाली जोशी यांनी प्रार्थना म्हटली. डॉ. आसावरी भट यांच्या प्रस्तावनेनंतर सूत्रसंचालिका सौ. अनुश्री क्षीरसागर यांनी कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली. डॉ. आसावरी भट यांच्या आभार प्रदर्शनानंतर कॉफीपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

साथ संगत च्या उषा राणे, मधुरा हेर्लेकर, आरती टिळक, सुलभा प्रभुदेसाई, स्मिता बेडेकर, सीमा देवस्थळी, श्वेता चिटणीस, शीतल कोळवणकर, रश्मी कर्णिक यांच्या मदतीने हा कार्यक्रम सुंदर रंगला.
मंडळाने काही कार्यक्रम आता YouTube वर टाकले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने मराठी दिनाच्या दिवशीच ७५ स्वातंत्र्य सैनिकांवर माहिती सांगणारे छोटे ७५ व्हिडिओ केले.

जानेवारी मध्ये मुलांसाठी रामाच्या गोष्टींचे व्हिडिओ केले, आणि आता डॅाक्टरांनी लिहीलेल्या २० पुस्तकांची माहिती
YouTube वर टाकली आहे.ती आपण जरूर पहावी.

असे हे आदर्श महिला मंडळ म्हणजे इतर भागातील महिला मंडळांना एक आदर्शच आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आदर्श महिला मंडळ हा साथ संगत या आपल्या मंडळाला मिळालेला सन्मान पाहून अतिशय आनंद झाला.
    महिलांसमोर एक सुदरसा आदर्श ….
    यातील सर्व सन्माननीय महिलांसाठी मानाचा मुजरा

  2. आदर्श महिला मंडळ हा साथ संगत या आपल्या मंडळाला मिळालेला सन्मान पाहून अतिशय आनंद झाला.
    फक्त सहा जणींनी वीस वर्षांपूर्वी लावलेलं हे इवलसं रोप…… आता गगनावेरी वेलू पसरला आहे.
    अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे सूत्रबद्ध संयोजन आणि सादरीकरण हे फार काटेकोरपणे पण तितक्याच खेळीमेळीने येथे सादर केलं जातं. आजूबाजूच्या सर्वच महिला मंडळांना वर्षातून एकदा तरी एकत्र येण्याची संधी देणं हा फार मोठा दृष्टिकोन आहे.
    वर्षातून एकदा तरी पार्ल्याच्या स्त्रियांना एकत्र व्यासपीठ मिळावं यासाठी हा अभिनव प्रयोग फारच अभिनंदन आहे.
    यात चित्राताई मेहंदळे यांचे योगदान फारच महत्त्वाचं आहे .एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या चित्राताई उत्तम कवयित्री लेखिका पेंटिंग्स आणि फोटोग्राफी करणाऱ्या कलाकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
    त्यांच्याबरोबर मधुरा श्वेता अनुश्री संगीता आणखी इतर अनेक स्त्रिया सर्व कार्यक्रम उत्कृष्ट होण्याच्या दृष्टीने सहकार्य करत असतात या सर्वांना डॉ आसावरी ताईंचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभत असतात.
    आपल्या साथ संगत या स्त्री मंडळाचे परत एकदा मनःपूर्वक अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८