सायबर गुन्हे हा सध्याच्या परिस्थितीत कळीचा मुद्दा बनला आहे. कृत्रिम बुध्दिमता हा जगभरात जिव्हाळ्याचा त्याचबरोबर अनामिक भीतीचा विषय वाटत आहे.
यामध्ये सायबर गुन्याच्या बाबतीत पोलीस अधिकारी त्यातही महिला अधिकारी म्हणून मला हे आवर्जुन सांगावेसे वाटते कि, स्त्रिया सायबर गुन्ह्यात जवळच्या (जसे की पुरूष मित्र, काॅलेज, नोकरी व अवतीभवती वावरणारे पुरूष यांच्या मुळेच अधिकतर बळी (व्हिक्टीम) पडतात. विशेषतः फिल्मी दुनियेतील अंगप्रदर्शन बाबत आजच्या काही तरूणी अनुकरण करू पहातात. मग ते बाॅयफेंडला, मित्राला आपले अंगप्रदर्शन होईल असे फोटोज, व्हिडिओ काढून पाठवितात. हेच मित्र संबधात बिघाड आला तर त्याचे सामाजिक मिडीयावर प्रसारण करू अशी धमकी देवुन त्यांचेवर अत्याचार करतात. तसेच काही तरूणी अत्यंत लज्जास्पद अंगप्रदर्शनाचे फोटो फेसबुक, वाटस्अॅप व इतर मिडीयावर टाकतात कारण कमाई होते.
जेंव्हा तरूणी या गोष्टीला बळी पडतात तेंव्हा त्यांनी ताबडतोब न घाबरता ही गोष्ट पालकांचे अगर जवळचे विश्वासू मित्र मैत्रिणी यांचे निदर्शनास आणून द्यावी व पोलीसांची मदत घ्यायला घाबरू नये.
दुसरी गोष्ट सायबर मध्ये जेंव्हा आर्थिक फसवणूक होते त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्या आमिषाला बळी पडतात. जसे कि, अगदी अलीकडे बदली झाल्याने फर्निचर स्वस्तात विकत असल्याचे ऑनलाईन टाकतात व त्यासाठी मोठ्या पोलीस अधिकारी आदिंचा दाखला, ओळख सांगतात व यात कधी कधी आर्मी चे स्टाफ असल्याचे सांगतात. मी येथे स्पष्ट सांगू इच्छिते कि, आर्मी व पोलीस यांना त्यांचे कुटुबांला वेळ द्यायला सवड नाही ते असे उद्योग कशाला करतील ? (अगदीच वाटले तर व ओळखीतील अधिकारी असले तर त्यांचेशी संपर्क फोन करून व बिझी असल्यास मेसेज वरून, व्हॉट्स ॲप वरून संपर्क करण्याचा प्रयत्न करा. मोहात सापडू नका.
आता सर्वसामान्याकडे वळू या. जवळजवळ व्यक्तीगणिक स्मार्टफोन आहे. पण त्यातील भाषा इंग्रजी भाषा न वापरता आपले पाल्याकडून आपले मातृभाषेत वापरावी. काही कळत नसेल तेव्हा पाल्यास किंवा जवळच्या विश्वासू व्यक्तींची मदत घ्या.
हल्ली सर्व बॅका सांगतात ओटीपी, बॅंकेचे अकाऊंट, एटीएम, पिनकोड कोणाबरोबर शेअर करू नका म्हणून वारंवार मेसेज टाकतात. त्या सूचना अमलात आणाव्यात. तसेच बाहेगावी गेल्यास मिडीयावर फोटो लगेच शेअर करू नये.
सर्वात महत्वाचे म्हणजे तरूणपिढीने व मिडीयाने, सरकारी पातळीवर वारंवार सायबर स्टाफ व तज्ञाकरवी जास्तीत जास्त जनजागृती करावी असे वाटते.
धन्यवाद-

— लेखन : सुनिता नाशिककर
-निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सायबर गुन्ह्यांच्या विषयावर सुस्पष्ट भाष्य आवडले. ह्या बाबतीत जनजागृती करणे आवश्यक आहे. ते आपण करत आहात. आपलं हार्दिक अभिनंदन 🎉🎉
Nowadays it is very important to all of us about cybercrime.U told all real facts and probabilities so that all people take care of this. Thanks to u.
सध्या सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे आपण अतिशय सोप्या शब्दात लेखन करून आपल्या लेखणीतून खूप छान शब्दात नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. या वाढत्या सायबर क्राईम गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध माध्यमातून प्रबोधनाची गरज आहे. आपण त्यात खारीचा वाटा उचलला यासाठी आपले आभार
धन्यवाद…
मुकेश श्रीकृष्ण धावडे
पत्रकार
खूप छान शब्दात सर्व सामन्यांना समजेल असे लिखाण करून समाज प्रबोधन करण्याचा आपला प्रयत्न अतिशय उल्लेखनीय आहे. धन्यवाद…