सावित्री
सावित्रीबाई फुले यांच्या काल, १० मार्च पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
जीवन त्यांचे संघर्षाचे
संघर्ष केवळ समाज कारणी
तेज:पुंज ज्योत सावित्रीरुपी
तळपली केवळ स्त्रीशिक्षणाकारणी
अर्धांगिनी ती ज्योतिबांची
ज्यांची वृत्ती सुधारकाची
सावित्रीस केले शिक्षीत
पर्वा सोडून कर्मठ समाजाची
सावित्री महिलांची मुक्तीदाता
घेतला वसा स्त्रीशिक्षणाचा
पदरी पडले चिखल दगडधोंडे
परि पाठपुरावा एका ध्यासाचा
रुढी तोडली परंपरा मोडली
समाजाचा बुरखा फाडला
स्त्री शिक्षित झाली
आणि संसार तरला…..
तीच ज्ञानज्योती विद्यादाती
भाग्यदाती गुण तिचे गाऊ
सदैव तिच्या ऋणात राहू
युगेयुगे नारीशक्तीला जागवू….
— रचना : सौ.राधिका भांडारकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800