Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : २६

साहित्य तारका : २६

कुमुदिनी प्रभावळकर रांगणेकर

माहेरच्या कुमुदिनी शंकर प्रभावळकर उर्फ कुमुदिनी रांगणेकर यांचा जन्म  २५ मार्च १९०६ रोजी कोल्हापूर येथे झाला. कुमुदिनी प्रभावळकर रांगणेकर या कथाकार कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनुवादक म्हणूनही स्वतःचे असं विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं..
त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. त्या लोकमान्य कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचे वास्तव्य मुंबईला होते. 

त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य लिहिले मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्य प्रकार… “नवल”’ या मासिकातून त्यांनी अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद केले.. त्यांनी केलेल्या’`मिल्स ॲन्ड बून’ प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून आणि ‘”नवल'” मासिकातून सतरा ते अठरा वर्षे प्रकाशित होत असत.

“अनियमित जग’ (१९३४) ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी.. “चार उणे एक बरोबर दोन’, , ‘मखमली वल्ली’ ‘मर्मबंध’,
मुलखा वेगळी,” ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीत, ‘एकेरी गाठ’,” विरलेले वस्त्र’ ‘परतदान’, ‘माळावरील खून’ बेसूर संगीत’, ‘पुनर्जीवन’, ‘पैजेचा विडा’ ‘प्रीतीचा गोलघुमट’ ‘मोही नयना मना’, ‘नियती’ , ‘रिती ओंजळ’, ‘कवठी चाफा’ ‘काजळरात’, ‘चकवा’ कुस्करलेलं हृदय’, ‘रंगेल राजा’, ‘कडू अमृत’ , ‘एकलीच दीपकळी’ , ‘एकटी दुकटी’, ‘ढगाळलेलं मन’ “मिटलेल्या पाकळ्या”, “मूक राही भावना”, माझे मला कळेना”, ता-यांचा मागोवा”, “प्रीतीचे कोडे”, ” पिंगट केसाची तरूणी”, “पाऊलवाटेच वळण””, इ. अनेक कादंबर्‍या प्रसिद्ध तर ” गोड बंधन” हा कथासंग्रह प्रसिद्ध प्रीतीचा शोध’ ‘फुललेली कळी’, ‘हरपलेलं गवसलं’ ‘क्षणाचं वैधव्य’ शकुनी मोहर या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्‍या…. कल्पना ही सामाजिक कादंबरी तर शकुनी मोहर ही ऐतिहासिक कादंबरी..

“कर्तव्याची जाणीव” या कादंबरीमध्ये कर्तव्यास दिलेले महत्त्व आणि तत्त्वनिष्ठा व त्याग यांचा विजय यामुळे कथानकात नावीन्य व चित्ताकर्षकपणा प्राप्त झाला आहे व “बेसूर संगीत” या कादंबरीमधून आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारे चित्रण केले आहे..

वेश्येच्या जीवनावर आधारित निर्माल्यातील कळी यासारखी कादंबरी त्यांनी लिहिली..
अशी त्यांनी तब्बल २३६ पुस्तके लिहीली… त्यांच्या कादंबर्‍यांची शीर्षके अर्थपूर्ण व आकर्षक असत.. कुमुदिनी रांगणेकर लिखित मखमला वल्ली ही बालकुमारांसाठीची दर्जेदार रहस्यमय साहस कादंबरी…
Baroness Orczy यांनी लिहिलेल्या Beau Bracade या कादंबरीचा अनुवाद आहे.. त्याचबरोबर त्यांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत…
इतकचं नाही तर मराठीतील महिला नाटककार म्हणूनही त्यांनी आपली मुद्रा मराठी रंगभूमीवर उमटवली…

विपुल लिहिणार्‍या बहुप्रसव लेखिका म्हणून वाचक वर्गात ख्यातनाम झालेल्या कुमुदिनी प्रभावळकर रांगणेकर यांचे १७ मार्च १९९९ रोजी निधन झाले..

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८