मालतीबाई दांडेकर
बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालतीबाई दांडेकर यांचा जन्म १३ एप्रिल १९११ रोजी धुळ्यामध्ये झाला.. वयाच्या १७ व्या वर्षी लग्न होऊन बुधगावला आल्यावर त्यांनी संसार सांभाळून एकीकडे लेखन सुरू केले आणि दुसरीकडे इंग्लिश शिकत इंग्लिशवर प्रभुत्व मिळवलं… तत्कालीन परिस्थितीमुळे फक्त इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मालतीबाईंनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लेखनास सुरुवात करून पुढच्या पाच दशकांत विविध प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली.
“मातृमंदिर’, ‘तेजस्विनी’ ‘कृष्णरजनी’, ‘दुभंगलेले जग’”, ‘वास्तू’ “तपश्चर्या”, “भिंगरी”,’ अमरप्रीती’ ‘चक्रवर्ती’ इ. अश्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या .कादंबरीतील “अष्टनायिका”’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण असून त्यांची अन्य काही पुस्तकेही वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत… तर.. ‘ज्योती’”, ‘पर्वकाळ ये नवा’ , ‘संगीत संस्कार’, ‘मावशी दी ग्रेट’ ही काही नाटकेही प्रसिद्ध .. (“मावशी दी ग्रेट’ हे संगीत नाटक असून त्यात सोनू मावशी व देवयानी ही दुहेरी भूमिका असून अशा प्रकारचे स्त्रीने लिहिलेले ते पहिले विनोदी नाटक..) त्यांनी मातृमंदिर, तेजस्विनी, वज्रलेख इ. कादंबऱ्यांतून मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवनातील समस्यांचे सहृदयतेने चित्रण केलेले आहे… “दगडातून देव'” या पुस्तकाला राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला..
त्यांनी लोकसाहित्याचा अभ्यास करून लोककथांवर अनेक पुस्तके लिहिली इतकच नाही तर त्यांनो देशोदेशींच्या लोकसाहित्याचा अभ्यास करून “लोककथा कल्पकता” हा ग्रंथ तसेच लोकसाहित्याचं विवेचन करणारा “लोकसाहित्याची लेणी” हा ग्रंथ ही त्यांनी लिहिला.. त्याचबरोबर अंधारातील तारे, अंधारातील देव, अलका, तू असं लिही, आता फुलांनाच जपायचे, आशांकुर, उज्ज्वला, कथा सुवर्ण, काटेरी मार्ग,गोड भेट, चंद्रज्योती, प्रतिमा, मधुमालती, वाङ्ममय शारदेचे नुपूर, विवाहानंतर, विसाव्याचे क्षण, साहित्य सागरातील मणीमोती इ. अश्या अनेक कथा, लोककथा व इतर साहित्य व त्यांचे सहवास हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले.
बालमनाला स्पर्श करणारी व त्यांच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तिदायक रचना म्हणजे बालवाङ्मय’ ही व्यापक व्याख्या करणा-या मालतीबाई यांनी आपल्या लहानपणी आजी कडून ऐकलेल्या गोष्टी त्यांनी अत्यंत सोप्या रंजक व आकर्षक भाषेत लिहून “माईच्या गोष्टी” म्हणून प्रसिद्ध केल्या. तर चीन, जपान, व्हिएतनाम सारख्या देशांतल्या परिकथाही मराठीत आणल्या..
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_20231227-123505.png)
स्वातंत्र्यपूर्व काळात मालतीबाई दांडेकर यांनी बालसाहित्याचा काव्य व गद्य विभाग नादमधुर सोप्या शब्दांनी विषयाच्या सुरेख सुटसुटीत मांडणीने अतिशय आकर्षक तर केलाच पण संपन्न ही केला… आधुनिकतेचे व आगळेपणाचे वळण देणा-या मालतीबाई यांनी स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्यात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले..
मालतीबाई दांडेकरांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या अनेक कादंबरीकांनी, कथांनी व नाटुकल्यांनी मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. माईच्या गोष्टी–(भाग २) जलराज्यातल्या जमती– (भाग २), चिनी गुलाब वगैरे त्यांची अनेक पुस्तके मुलांची आवडती आहेत..
याशिवाय मालतीबाईनी बालसाहित्याची रूपरेखा हे मौलिक व अभ्यासपूर्ण पुस्तक लिहून बालसाहित्याच्या विकासाचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. या पुस्तकामुळे बालसाहित्य छापले जाऊ लागल्यापासून त्याच्या प्रकृतीत, भाषेत, कल्पनाविष्कारात व शैलीत वेळोवेळी कसा फरक होत गेला हे ध्यानी येते…
१९७७ साली जळगाव येथे भरलेल्या ‘”बालकुमार साहित्य संमेलना”’च्या त्या अध्यक्षाही होत्या… अश्या या महान लेखिकेचे १४ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले..
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230126_130748.jpg)
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869454800