कमल पाध्ये
आत्मचरित्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, “बंध अनुबंध” नावाच्या दर्जेदार आत्मचरित्रात्मक कादंबरीमुळे अफाट लोकप्रियता मिळालेल्या, वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका कमल पाध्ये यांची आज ओळख करून घेऊया…
वैचारिक लेखन, सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच लेखक, विचारवंत, पत्रकार, सौंदर्यमीमंसक प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी कमल पाध्ये माहेरच्या कमल विनायक गोठोसकर यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२० रोजी झाला.
ब्रीच कँडीच्या फणसवाडी शाळेतून त्या व्हर्न्याक्यूलर फायनल उत्तीर्ण पास झाल्या १९४३ साली त्या बी.ए. झाल्या.
“मैत्रीच्या पलीकडे’ या नियतकालिकाच्या संपादक म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले होते.
कमल पाध्ये यांनी लिहिलेली पुस्तके:–
भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास : १८५८ ते १९४७ (अनुवादित, मूळ पुस्तक The Indian Muslims लेखक –
राम गोपाल) भारतीय स्त्रीधर्माचा आदर्श “बंध अनुबंध –आत्मचरित्र त्यांच्या “बंध अनुबंध” या दर्जेदार आत्मचरित्रात्मक कादंबरीमुळे त्यांना अफाट लोकप्रियता तर मिळालीच पण कधीही पुसली न जाणारी ओळख व किर्ती प्राप्त झाली. त्यांच्या विलोभनीय लेखन कौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव व त्यांच्या पतीच्या (पत्रकार प्रभाकर पाध्ये) गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधत या कादंबरीला साहित्य विश्वात एका उंचीवर नेऊन ठेवले.. मराठी साहित्यविश्वातील मैलाचा दगड ठरलेले हे आत्मचरित्र… इतकचं नाही तर त्यांनी “वुमनहुड ऑफ इंडिया”’ या मानवेंद्रनाथ रॅाय यांच्या पुस्तकाचा अनुवाद देखील केला आहे.
कमलताई यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पालघर भागात आदिवासी प्रकल्पाचे काम त्यांनी केले. कमलताईंचे आदिवासी प्रकल्पाचे काम पालघर-मनोर रस्त्यावरच्या मासवण आणि आजूबाजूच्या परिसरात होते.जातिभेद, अंधश्रद्धा, स्त्रीमुक्ती, समानता या विषयांवर त्या व्याख्याने देत असत.
समाज कार्यकर्त्यांच्या प्रकल्पात कमलताई शिबिरांचे आयोजन करीत. अशा शिबिरांत महाराष्ट्रातील सर्व थरांतल्या स्त्रियांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली.
समाजवादी महिला सभेचे त्या काम करत असताना महिलांचे प्रशिक्षण करणार्या अनेक पुस्तिका त्यांनी लिहिल्या.
स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी अनेक स्फुट लेखही प्रसिद्ध केले.
कमलताईंची सदैव जागृत असलेली सामाजिक जाणीव त्यांनी स्त्रीमुक्तीचा जितका व्यावहारिक विचार केला तितकाच तात्त्विक अभ्यास ही केला.
कै. कमल प्रभाकर पाध्ये यांच्या नावाने प्रभाकर व कमल पाध्ये विश्वस्त निधीतर्फे समाजसेवेसाठी एक पुरस्कार ठेवला आहे आणि हा पुरस्कार विद्याताई बाळ यांना मिळाला होता.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या कमलताई पाध्ये यांचे १९ जून १९९६ रोजी देहावसान झाले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800