मन व बुद्धीचा अजब हा खेळ,
कसा जुळावा जगण्याचा मेळ.
मन असते भावनिक,
बुद्धी पक्की व्यवहारिक.
मन असते चंचल,
बुद्धी मात्र कणखर.
मनात असतो आपलेपणा
बुद्धीला लागतो मोठेपणा.
मन असते सारथी,
बुद्धी थोडी स्वार्थी.
मनात अनेक आशा आकांशा,
बुद्धी निर्माण करते शंका.
मन जपते नात्यातील तोल,
बुद्धी करते चढा ओढ.
मन असते स्वप्नाळू,
बुद्धी तशी कष्ठाळू.
मन घेते समजून,
बुद्धी घेते पारखून.
मन असते निरागस,
बुद्धी मात्र चौकस.
मनात अनेक इच्छा,
बुद्धी दाखवती योग्य दिशा.
मनात अपेक्षांच्या सरी,
बुद्धी घेते उंच भरारी.
दोघांचेही समान महत्व,
सुवर्णमध्य साधण्यात असते कर्तृत्व.
हे तर सुखी जीवनाचे रहस्य,
हे तर सुखी जीवनाचे रहस्य.

रचना : सौ रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.
निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
खूपच छान….
मन आणि बुद्धी
यांची अतिशय छान आणि योग्य शब्दात मांडणी…
Keep it up