सुख म्हणजे काय ?
हृदय आकाराने लहान
सामावून घेते विश्व
विचार असावेत महान
नको अहंकार मोह
षड्रीपूंचा करावा त्याग
पापभिरू दांभिक वृत्ती
करावा ह्याचा सदा याग
अनमोल आहे आयुष्य
सत्कारणी लावण्या यत्न
संयम ठेवून स्वभावात
मदतीचा करावा प्रयत्न
आपल्यापेक्षा दुःख
जना जनात शोधावे
सारे दुःख बाजू सारुन
स्वतः सुखास निरखावे
गीताध्यायी योगेश्वर वदे
हृदयाने जोडावी नाती
धन संपत्ती सर्व त्यागून
नाती टिकवे धन्य ती माती
इश सर्वात सामावलेला
क्षूधा तृष्णा सख्य भक्तीत
शिक मानवा हृदयातून
भूतदया अनाथ माया युक्तीत
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : दवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800