निसर्ग चक्र हे अविरत सुंदर, झरती जलधारा,
तृशार्त धरती, शांत नाहते, येते बहराला,
वृक्ष, वेली त्या न्हाहून निघती, नवयौवन येते,
तृप्ततेचे असे साचणे, नवसृजन होते,
डोंगरावरी पर्जन्याचा पडतो मोठा सडा,
येई खळाळत पाणी झऱ्यांतून, नाद तो वेडा,
हिरवा परिसर, मोहक सगळे, टवटवीत होते,
चला पाहुया निसर्ग सुंदर, मन ते मोहरते,
वेगवेगळे गुलाब फुलती, बहरतो मोगरा,
अनेक रंगी फुले उमलती, निशिगंध दर्वळला,
सुवास पसरे, असा चहुकडे, मन होते धुंद,
सुखी माणसे, पशु आनंदित, मनात गोविंद…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800