Tuesday, June 24, 2025
Homeबातम्यासौ. गोदूताई जांभेकर विद्यालय : शतक महोत्सवी सोहळा संपन्न

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय : शतक महोत्सवी सोहळा संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रत्नागिरी येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय या प्रशालेचा दोन दिवसीय शतक महोत्सवी सोहळा नुकताच संपन्न झाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केंद्रीय ऊर्जामंत्री श्री. श्रीपाद नाईक म्हणाले की, भविष्यात गुणवत्ताधिष्टित शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल केले जात आहेत. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधिष्टित शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सर्वसामावेशक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांचे नातू डॉ. मुकुंदजी जोशी, गिरीश जोशीं, नात माधुरी लोकापुरे, ज्यांच्या देणगीतून ही शाळा उभारली गेली. या प्रसंगी गोदुताई जांभेकर यांचे नातू विजय जांभेकर, नातसून नीता जांभेकर आणि पणती प्रज्ञा जांभेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे आणि मान्यवर उपस्थित होते.

गोदूताई परुळेकर यांच्या पणती प्रज्ञा जांभेकर यांचा सत्कार

कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात ‘माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही अशा प्रकारच्या शिक्षणापेक्षा गरजाधिष्टित शिक्षण देण्याचा संकल्प’ असल्याचे सांगितले. संस्थेच्या घटक संस्थेत तंत्रस्नेही शिक्षण तसेच आयबीटी सारखे शिक्षण देणारे कोर्सेस चालू केले जातील तरच समाजातील विषमता दूर होईल असे त्यांनी सागितले.

शतक महोत्सवी सोहळ्याची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. नंतर दीपप्रज्वलन करून तसेच संस्थापक कै. बाबुराव जोशी, मालतीबाई जोशी तसेच भूतपूर्व कार्याध्यक्ष कै. अरुआप्पा जोशी व देणगीदार सौ. गोदूताई जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष श्री. राजन मलुष्टे यांनी केले.

यावेळी प्रशालेच्या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विजयजी साखळकर, सर्व नियमक मंडळ सदस्य, संस्था पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

शतक महोत्सवी सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रशालेच्या इंग्रजी शिक्षिका संजना तारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी मानले.

या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, हितचिंतक व शंभर वर्षातील माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शतकपूर्ती निमित्त, शाळेत दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

— लेखन : प्रमोद कोनकर. रत्नागिरी
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एका संस्थेच्या भव्य शतक महोत्सवी सोहळ्याचे सुंदर शब्दांकन वाचायला मिळाले. सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरुणा मुल्हेरकर on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on पत्रकारिता हे माझे पहिले प्रेम – देवेंद्र भुजबळ
सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे