तिरंगा सँडविच
आपल्या देशासाठी खुप महत्वाचा, अभिमानाचे दिवस म्हणजे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन होत. प्रजासत्ताक दिन नुकताच होऊन गेला आहे, त्यानिमित्ताने आज जाणून घेऊ या तिरंगा सँडविचची रेसिपी..
– संपादक
झटपट आणि सहज खाता यावी आणि जितकी दिसायला सुंदर, आकर्षक तितकीच टेस्टी आणि पोट भरीची .. लहान मुले सहसा कच्च्या भाज्या खायला तयार नसतात. त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम आणि खुशीने खातील अशी ही उत्तम डिश
म्हणजे तिरंगा व्हेज सँडविच आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही खास डिश आहे. आता ती कशी करायची हे पाहू या.
साहित्य :
4 सँडविच ब्रेडचे कडा काढलेले स्लाईस , बटर , हिरव्या स्टफींग साठी – 2 चमचे खोवलेला नारळ , कोथिंबीर ,4..5 हिरव्या मिरच्या ,3..4 लसूण पाकळ्या ,किंचित आले ,आवडत असेल तर 4..5 पुदिन्याची पाने , 5..6 पालकाची ब्लान्च् केलेली पाने , जिरेपूड ,मीठ व साखर चवीप्रमाणे ,अर्धा चमचा पाहिजे असेल तर मिंट मेयोनीज .
केशरी स्टफींगसाठी – 1 केशरी गाजर साल काढून तुकडे केलेले , 1 लाल मिरची ,2 लसूण पाकळ्या , जिरेपूड ,मीठ व साखर चवीनुसार , केशरी सँडविच स्प्रेड अर्धा चमचा , केचप .
पांढऱ्या स्टफींग साठी – पाव वाटी पनीर खिसलेला , अर्धा चमचा व्हाईट मेयोनीज ,1 छोटा बटाटा उकडून साल काढून कुस्करलेला , मिरपूड ,मीठ चवीनुसार , 1 चीझ क्यूब .
कृती :
पांढरे स्टफिंग बनवण्यासाठी प्रथमएका बाऊल मध्ये बटाट्यात पनीर व मेयोनीज घालून त्यात 1 चिमूट मिरपूड, घालून चवी नुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून सारण बनवून घ्यावे.
केशरी स्टफींग बनवण्यासाठी मिक्सर मध्ये केशरी गाजराचे बारीक तुकडे, लाल ओलिमिरची किंवा पाव चमचा लाल तिखट, मीठ, लसूण, जिरेपूड, साखर चवीप्रमाणे घालून छान फिरवून दुसऱ्या बाऊल मध्ये काढून घ्यावे.
हिरवे स्टफींग बनवताना नारळ, हिरव्या मिरच्या, पालक पाने, कोथिंबीर, पुदिना पाने, आले, लसूण, जिरेपूड, मीठ व साखर चवीनुसार.
सँडविच ची कृती :
प्रथम सर्व ब्रेडच्या कडा काढलेल्या स्लाईसना सुरीने व्यवस्थित बटर लावून घ्यावे. कारण बटरच्या कोटीन्गमुळे स्टफींग ओलसर असले तरी ब्रेड मऊ पडत नाही आणि सँडविच सॉफ्ट राहते. चवीला सुद्धा त्यामुळे खूप छान लागते. मग एका स्लाईस वर पांढरे स्टफींग घालून त्यावर मेयोनीज घालावे.
दुसऱ्या स्लाईस वर केशरी सँडविच स्प्रेड पसरून त्यावर केशरी स्टफींगचा व्यवस्थित थर द्यावा व त्यावर. केचप घालावे.
आता तिसऱ्या ब्रेडच्या स्लाईस वर मिंट मेयोनीज पसरून त्यावर हिरव्या स्टफिंगचा थर देऊन घ्यावा.
शेवटी आधी हिरव्या स्टफिंगची बाजू वर करून पहिला स्लाईस ठेवावा. त्यावर पांढऱ्या स्टफींगची बाजू वर ठेवून दुसरा स्लाईस ठेवून त्यावर व्हाईट मेयोनीज घालून चीज खिसून घालावे. नंतर केशरी स्टफींगच्या बाजूवर एक ब्रेडचा स्लाईस ठेवून ते पांढऱ्या स्टफींगच्या स्लाईस वर ठेवावे.
शेवटी मध्यभागात तिरके सुरीने कापून दोन त्रिकोणी भाग बनवून सँडविच बनवून घ्यावे. त्यावर आवडत असेल तर चीझ खिसून घालावे व हे तिरंगा सँडविच सर्व्ह करावे.
वैशिष्ट्य :
मध्ये तिरका कट करून बनवलेले हे सँडविच तीन रंगांमुळे खूपच सुरेख दिसते. पाहूनच खाण्याचा मोह् आवरणे अशक्यच आहे. ओलसर असल्यामुळे खाताना मजा येते, विविध भाज्या, सॉस, बटर, पनीर, चीझ व मेयोनीज मुळे खूपच टेस्टी लागते. भरगच्च स्टाफींग मुळे पोटभरते. शिवाय तेलकट, तुपकट किंवा जास्त मसालेदार नसल्यामुळे कोणीही सहज व आवडीने खाऊ शकतात. चावण्याचेसुद्धा जास्त कष्ट पडत नाहीत. शिवाय प्रवासात, डब्यात किंवा नाश्त्याला, मधल्यावेळी कधीही सहज खाता येते.
क्रमशः

— लेखन : सौ .स्नेहा मुसरीफ. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800