दिवाळी अंक म्हणजे मराठी सारस्वतातलं अनमोल दालन! मराठी लेखक, कवींना लिहितं ठेवण्याचं आणि कसदार साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवाळी अंकांनी मागील शंभराहून अधिक वर्षे सातत्यानं केलं आहे.
यंदा प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांची रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांना ओळख करून देण्याबरोबरच उत्कृष्ट दिवाळी अंकांची राज्यस्तरीय स्पर्धा स्नेहालयाच्या “रेडिओ नगर 90.4 fm” ने आयोजित केली आहे. सर्वोत्तम तीन दिवाळी अंकांना गौरवचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल.

दिवाळी अंक पाठवण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२३ आहे. आपल्या दिवाळी अंकाची एक प्रत कृपया खालील पत्त्यावर पाठवावी.
रेडिओ नगर 90.4 fm
स्नेहालय प्रतिसाद केंद्र
डाॅ. आडकर संकुल, लेंडकर मळा
बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर
पीन 414 001
संपर्क : 9881337775
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800