Saturday, October 5, 2024
Homeसाहित्यस्नेह हा घुंघूरवाळा….

स्नेह हा घुंघूरवाळा….

स्वार्थ नसावा आपला
नको वाद घरामध्ये ।
आपुलकीतले नाते
धागे दोरे मनामध्ये ।।१।।

द्यावे पाणी येणाऱ्याला
वाणी हवी गोड तशी ।
जाणाऱ्याच्या मनी हवी
येण्यासाठी ओढ जशी ।।२।।

प्रेम माणुसकीचाच
झरा असो मनामध्ये।
नाव त्याचे जगतात
कीर्ती राहो जनामध्ये ।।३।।

नको भेदभाव, नांदी
असल्यास विसरावी ।
समजून वागताना
त्याची आढी झुगारावी ।।४।।

नको रुसवे फुगवे
मोद हवा मनामध्ये ।
नित्य काळजी घराची
प्रेम त्याग रक्तामध्ये ।।५।।

लळा जिव्हाळा, नसावा
वर वरचा उमाळा।
गर्व नसता धनाचा
स्नेह हा घुंघूरवाळा ।।६।।

अरुण पुराणिक

— रचना : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९