Wednesday, September 11, 2024
Homeसेवाहवाय एक हात मदतीचा

हवाय एक हात मदतीचा

मूळ कोकणातील पण नोकरी निमित्त मुंबईत राहणारे श्री संदीप बाळकृष्ण नरोटे, (वय ४७) यांना मेंदूच्या उजव्या बाजूच्या ट्रान्सव्हर्स – सिग्मॉइड ड्युरल एव्हीएफ चा त्रास आहे.

श्री संदीप नरोटे हे पूर्वी एक कंपनी मध्ये डेटा एंट्रीचे काम करीत असतांना २०१४ च्या दरम्यान त्यांना हा त्रास सुरू झाला. त्रास वाढल्यावर काम होत नसल्याने त्यांना नोकरी सोडून द्यावी लागली.

श्री नरोटे, बरे असताना…

२०१५ मध्ये त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या कडून उपचार केला असता त्यांचे एकूण ७.५० लाख रुपये खर्च झालेत. या उपचारादरम्यान त्यांची जमा रक्कम पूर्ण खर्च झाली. नोकरी नसल्याने त्यांनी आतापर्यंत कसातरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

दुर्दैवाने आता पुन्हा श्री नरोटे यांचा त्रास वाढल्याने ते १ जून पासून आतापर्यंत मुंबई येथील सायन हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागातील डॉ. नितीन डांगे कडून पुन्हा उपचार घेत आहे. सध्या या उपचारासाठी अंदाजे ११ लाख १६ हजार ५२० रू. खर्च असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आजच्या घडीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहची जबाबदारी त्यांची पत्नी सौ. संगीता नरोटे हिच्यावर आली असल्याने ती काही कामधाम करीत आहे. तिचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक रु. १ लाख ५८ हजार इतके आहे. तिच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. या कुटुंबांमध्ये सौ. संगीता, पती, एक लहान मुलगा आणि मतिमंद दिर आहे. आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे. त्यामुळे ती वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची व्यवस्था करू शकत नाही. एवढ्या कमी उत्पन्नात, आपल्या पतीचा उपचार करणे शक्य नसल्याने तिने आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी, टाटा ट्रस्ट आणि काही दानशूर व्यक्तींनी काही प्रमाणात मदत केली आहे. पण ही मदत अपुरी पडत असल्याने सौ नरोटे यांनी उपचाराकरीता मदत करण्याचे आवाहन केले आहे.

तरी आपण उदार अंतकरणाने आपला मदतीचा हात पुढे करीत, या रुग्णाला आर्थिक सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन करण्यात येत.

ऐच्छीक दात्यांनी आपली आर्थिक मदत थेट सौ नरोटे यांच्या पुढील बँक खात्यात जमा करावी.
Bank Details—
Name : Sangita Sandeep Narote
State Bank of India
A/c No :- 30622746175
IFSC No :- SBIN0000567
G PAY No :- 98926 29512

मदत केल्यावर UTR किंवा UPI ट्रंँझेक्शन नंबरचा स्क्रीनशॉट, आपले नाव-गावासहित आपल्या पोर्टल च्या पुढील व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवावा. 👉 9869484800

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments