Thursday, May 30, 2024
Homeलेखहसण्यासाठी जन्म आपुला !

हसण्यासाठी जन्म आपुला !

नुकताच, ५ मे रोजी जागतिक हास्य दिन होऊन गेला. मे महिन्याचा पहिल्या रविवारी हा दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने माझे विचार मी इथे मांडत आहे. पण ते विचार मात्र आपण गांभीर्याने घ्याल, हसण्यावारी नेणार नाहीत, अशी अपेक्षा करते.

अमेरिकेतील प्रसिद्ध हास्यकलाकार न्यूहर्ट यांच्या म्हणण्यानुसार, ‘The only way to survive is to have a sense of humour’, अर्थात ‘जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विनोदबुद्धीची निर्मिती होय.’

मा. देवेंद्रजी भुजबळ यांनी हास्यदिनाच्या निमित्ताने लेखणीबद्ध केलेला “हसा आणि हसवा लेकहो” हा हलका-फुलका लेख म्हणजे त्यांनी वाचकांना पाजलेला जणू चिंतनात्मक हास्य डोसंच होय.

वास्तविक, समोरच्याला बत्तीशी दाखवायला भाग पाडणं, हे महाकठीण काम होय. पण ज्यांना प्रसंगनिष्ठ विनोदनिर्मिती कशी करायची याचं गमक कळलं, त्यांनी जग जिंकलंच म्हणून समजा.

एकविसाव्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्तेप्रमाणेच मानवी भावना शब्दांमधून नव्हे, तर ‘इमोजीं’ मधून व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. गप्पा-टप्पांचा कार्यक्रम आॅनलाईन माध्यमातून रंगवताना इमोजींची मुक्त उधळण करणार्‍या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इमोजी पाठवण्याची स्पर्धाच जणू सुरू असते. लेखक देवेंद्र भुजबळ यांनी याच विषयावरती विनोद निर्मिती करण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. वाचक एखाद्या लेखावरती आपला प्रतिसाद नोंदवताना ‘अंगठा’ दाखवून कसे मोकळे होतात व आपलं काम झाल्याचा आव कसा आणतात, हा सदर लेखातील अंश प्रत्यक्षात वाचून ‘ठेंगा’ दाखवणारी हीच वाचक मंडळी मग खदखदून हसू लागतात.

साहित्यातून शाब्दिक गुदगुदल्यांनी वाचकांना हास्यतुषारात भिजवणारी लेखनकर्ती मंडळी, तसेच जीवनातला रटाळपणा कमी व्हावा, याकरिता मोजक्या विनोदी ठिपक्यांमध्ये हास्यरांगोळी चतुराईने काढणार्‍या त्या सर्वांनाच माझ्याकडून मी आभार प्रदर्शित करते. आपण असेच इतरांना हसवत रहा, सोबत स्वतःची बत्तीशी सुद्धा दाखवा. शेवटी, ‘आपके टूथपेस्ट में नमक’ तो होगा ही !

— लेखन : प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. हसा आणि हसवा , सुखी आरोग्यदायी आयुष्य जगा .सर्वाकरीता कानमंत्र . ह्या सत्य वाणीने सर्वांचे मंगल होवो.

  2. प्रियांका तुमचे भुजबळांच्या लेखावर मांडलेले विचार यथार्थ आहेत.
    मला तर नेहमीच वाटतं की जिवनात रटाळपणा नको खट्याळपणा हवा. खरंच ते सुसह्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments