Saturday, July 27, 2024
Homeबातम्या"हुंदके सामाजिक वेदनेचे": नेपाळमध्ये प्रकाशित

“हुंदके सामाजिक वेदनेचे”: नेपाळमध्ये प्रकाशित

काठमांडू : आंतरराष्ट्रीय स्तरावरील कवी संमेलन आणि जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या ऐतिहासिक जयंतीच्या निमित्ताने काठमांडू, नेपाळ येथील हॉटेल हॉलिडे रेजेन्सी रारा कॉन्फरन्स हॉल थामेल, काठमांडू येथे “काव्यधारा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था” छत्रपती संभाजी नगर या संस्थेच्या विद्यमाने संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनात निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव लिखित आणि न्युज स्टोरी टुडे प्रकाशित “हुंदके सामाजिक वेदनेचे” या पुस्तकाचे प्रकाशन सेवानिवृत्त न्यायाधीश सन्माननीय नामदेव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच श्री राजाराम जाधव यांना “समाजभूषण साहित्यिक व लेखक हा पुरस्कार व सन्मानपत्र देऊन डॉ संघर्ष सावळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अशोक पवार, प्रमुख पाहुणे सन्माननीय नामदेव चव्हाण न्यायाधीश सेवानिवृत्त, सदर संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. संघर्ष सावळे, ॲड विजयकुमार कस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिवरे (बुद्रुक) येथील स्वामी विवेकानंद आश्रमाचे प्राचार्य शेळके यांनी केले.

या प्रसंगी मा. डॉ संघर्ष सावळे यांनी राजाराम जाधव सेवानिवृत्त सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेताना सांगितले की, श्री जाधव साहेबांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रशासकीय सेवा बजावत असतांनाच साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील दायित्व ओळखून फार मोठी कामगिरी केली आहे आणि म्हणूनच “साहित्यधारा बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेने” त्यांना “समाजभूषण साहित्यिक व लेखक” हा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. यापुढेही त्यांच्या हातून अशीच साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील सेवा घडावी यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देत आहोत.

सन्माननीय नामदेव चव्हाण सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी “हुंदके सामाजिक वेदनेचे” या पुस्तकाच्या शीर्षकावरून कोणत्याही व्यक्तीला कळते की, राजाराम जाधव यांनी लिहिलेल्या पुस्तकात आजच्या सामाजिक परिस्थितीबद्दल अतिशय समर्पक व ज्वलंत विषयावर हे सर्व लिखाण केले आहे. त्यावरून श्री जाधव साहेब यांनी आपली सामाजिक जबाबदारी, बांधीलकी व दायित्व जपत या साहित्याच्या माध्यमातून आपल्या बंजारा व बहूजन समाजातील अनेक व्यथा वेदनांची अतिशय तीव्रतेने दखल घेत आपल्या साहित्यातून आपल्या समाजासमोर ही भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या या मौलिक कार्याची दखल समाजाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा व्यक्त करतो.

प्रा.डॉ अशोक पवार यांनी सदर पुस्तकातील विविध प्रकरणातील विचारांचा सर्वंकष आढावा घेताना सांगितले की, “सदर ग्रंथातील प्रत्येक प्रकरणातील वैचारीक लिखाणाच्या मांडणीवरून श्री राजाराम जाधव यांच्या मनातील बंजारा समाजाच्या वर्तमान परिस्थितीत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीबद्दलची खदखद व्यक्त होताना दिसते. त्यांच्या ह्याच विचारांमुळे आज बंजारा समाजातील एक नामवंत साहित्यिक – लेखक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. म्हणूनच त्यांच्या या मौलिक कार्याची दखल घेऊन “साहित्यधारा बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेने त्यांना समाजभूषण साहित्यिक व लेखक म्हणून गौरव करण्यात आला आहे. जाधव साहेबांच्या भविष्यातील साहित्यिक लिखाणासाठी आमच्या शुभेच्छा व्यक्त करतो.

याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांची जयंती भारत देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहासात प्रथमच साजरी करण्यात आली. ही बंजारा समाजासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे असे उद्गार श्री राजाराम जाधव, यांनी काढले. तर प्रा. डॉ. अशोक पवार आणि इतर मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.

शेवटी हा कार्यक्रम कवी संमेलन आयोजित करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ विजयकुमार कस्तुरे, होते. तर कविवर्य डॉ.खंदारे, श्री बबनराव महामुने, प्राचार्य शेळके, श्रीमती वेले आणि राजाराम जाधव यांच्या काव्य रचनेला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या “माझी लाडली” या काव्य रचनेने तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या आभार प्रदर्शनानंतर समाप्त झाला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अभिनंदन राजाराम जी जाधव सर यांचे. शुभेच्छा 🙏

  2. फारच सुंदर…
    ” हुंदके सामाजिक वेदनेचे” – राजाराम जाधव
    हे पुस्तक कुठे मिळेल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments