Thursday, January 16, 2025
Homeसाहित्यहॅप्पी न्यू इयर !!!!!

हॅप्पी न्यू इयर !!!!!

तो म्हणाला,
“हे बरोबर नाही
नववर्षाचं स्वागत
करायचं नाही
आपलं वर्ष गुडीपाडव्याचं “त्यां”चं अनुकरण
करायचं नाही”

मी म्हणालो,
“आजची तारीख काय ?”
“३१ डिसेंबर”
“आजची तिथी काय ?’
“माहीत नाही”
“मग आपलं नक्की काय ?”

मला रोजची
तारीख माहिती
माझं सगळं नियोजन
तारखेवर
म्हणून माझं
नववर्षही तारखेवर

मग पाडवा ?
तो ही माझा आहेच
मी आनंदाचा प्रवासी,
जिथे आनंद तिथं मी.
‘शादी कीसीकी हो,
अपना दिल गाता है.’

ही माझी वृत्ती,
हा माझा पिंड.
खरं तर प्रत्येक सकाळ
ही एका नववर्षाची
सुरुवात असते.

सवेरेका सूरज हमारे लिये है,
असं म्हणणारा कलंदर मी
न जाने कोनसा पल मौत की अमानत हो.
हर एक पलको खुशी से गले लगाते जियो

हीच वृत्ती असावी
खरं म्हणजे प्रत्येक क्षणच
नवा असतो, नवा जगायचा असतो,
कोणता क्षण अंतिम असेल
हे काय ठाऊक ?
म्हणूनच प्रत्येक क्षण
साजरा करावा
प्रत्येक दिवस साजरा करावा

पण रोज साजरा करायला
जमतंय कुठं ?
जमलं तर ते ही करावं
कुणाच्याही आनंदात
आपला आनंद शोधावा.
आनंदाला ना जात ना धर्म
ना देश.

म्हणूनच,
आनंदाचे डोही आनंद तरंग…
असं म्हणत मित्रांनो
साजरा करूया
निखळ आनंद,

मग तो कुणाचा का असेना,
आणि कधीही का असेना !!!
तर चीssssssssअsssssर्सssss
हॅप्पी न्यू इयर !!!!!

सुनील देशपांडे

— रचना : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय