अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा हैदराबादतर्फे नुकतेच बालकांच्या मराठी कविता सादरीकरणाचा “काव्य वाचू कवतिके” हा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि संगीता तांबे यांच्या सुरेल सरस्वती वंदनेपासून झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष माधव चौसाळकर यांनी बालकुमार साहित्य संस्था आणि कार्यक्रम यावर प्रास्ताविक प्रस्तुत केले.
उद्घाटनपर भाषणात युवा कार्यकर्ती वैदेही दलाल हिने साहित्याचे महत्व सांगून थोर व्यक्तीची उदाहरणे दिलीत. विशेष अतिथी आदरणीय विश्वास पिसोळकर यांनी मातृ भाषेवर बहुमूल्य विचार प्रस्तुत केले. श्री प्रवीण कावडकर यांनी मराठी भाषेचे महत्व जतन करणे यावर भर दिला. मा .चारूताई मंत्रवादी यांनी मुलांकरिता असे व्यासपीठ संस्थेने प्रस्थापित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. संस्थेची कार्यवाह अंजली फोफळे पुढे बालसाहित्यिक निर्माण होतील हि आशा व्यक्त केली.
अ .भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था हैद्राबाद शाखेच्या अध्यक्षा मीना खोंड यांनी सांगितले की साहित्य, संस्कृती आणि संस्कार हे आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. पालकांनी मुलांना मातृभाषा मराठी शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा बालक हा उद्याचा मराठी वाचक, साहित्यिक आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचधाराच्या मासिकाच्या संपादिका आणि मराठी साहित्य परिषद हैद्राबाद अध्यक्षा डॉ विद्याताई देवधर या आपल्या भाषणातून मुलांना आनंद देणाऱ्या कवितेच्या भावविश्वात घेऊन गेल्या. श्रोते बालपणाच्या आठवणीत रमून गेले. संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. विनायक खोंड यांनी कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली.
कविता सादरीकरण आणि श्लोक, स्तोत्र पाठांतर असा “काव्य वाचू कवतिके” बालकांचा कार्यक्रम यशस्वी झाला. तेलगू भाषा, शिक्षणाचे इंग्लिश माध्यम, शाळेत मराठी विषय नाही. अशा परीस्थितीत 41 सहभागी बालक झाले. नर्सरी, KG1, KG2 बालकांपासून. 6वी -7 वी पर्यतच्या मुलामुलींनी अतिशय सुंदर सादरीकरण केले. निरागस बालकांचा आणि पालकांचा ऊर्जा उत्साह दांडगा होता. छोट्या मुलांचे कविता श्लोक, स्तोत्र सादरीकरण बघून सगळ्यांना निकोप आनंद मिळाला.
— टीम एन एस टी. ☎️9869484800
‘काव्य वाचू कवतिके’ हया ऑनलाईन कार्यक्रमाचा अहवाल वाचनीय वाटला.