वयोमान व आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना मतदानाचा हक्क बजावतांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी भारत निवडणुक आयोगाकडून ८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी “घरातून मतदान” या विशेष उपक्रमाद्वारे घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १२० सिन्नर विधानसभा मतदार संघातील विजयनगर येथील रहिवासी श्रीमती कुसुमताई मधुकर घोगे यांनी काल, मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी “घरातून मतदान” या सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान केले.

भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या या सुविधेबद्दल कुसुमताई घोगे यांनी समाधान व्यक्त करुन उपस्थित अधिकार्यांचे आभार मानले.
९२ व्या वर्षी श्रीमती कुसुम घोगे यांनी मतदान केल्याचे पाहून उपस्थित अधिकार्यांनी आम्हालाही या प्रसंगामुळे काम करण्याची उभारी मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीमती कुसुमताई घोगे यांचे पुत्र, माहिती व जनसंपर्क महासंचानालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. रवींद्र म. घोगे व सौ. स्वाती घोगे इत्यादी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800