Home बातम्या अंकशास्त्र पुस्तक प्रकाशित

अंकशास्त्र पुस्तक प्रकाशित

0

अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे. प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्याशी संबंधित अंक, शुभ अंक याचे निश्चित एक नाते असते. त्या मुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्याशी संबंधित असलेले अंक जाणून घेणे, हे नेहमीच त्याच्या हिताचे ठरत असते.

हे ओळखून नवी मुंबई निवासी गणितज्ञ व अंकशास्त्री मनोहर आर. पुथ्रान यांनी ‘सक्सेस इन लाईफ : न्युमरो मॅजिक’ हे पुस्तक लिहिले आहे.

प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी व दिपिका पदुकोण यांना समर्पित केलेल्या या पुस्तकाची पहिली प्रत ‘नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्‌स’चे उपाध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार विश्वरथ आर. नायर यांच्या हस्ते ‘न्युजबॅण्ड’ दैनिकाच्या उपसंपादिका मीना प्रशांत यांना प्रदान करण्यात आली.

हा कार्यक्रम या पुस्तकाचे लेखक मनोहर आर. पुथ्रान तसेच दैनिक आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत, नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत दै. न्युजबॅण्ड या वृत्तपत्राच्या कार्यालयात नुकताच पार पडला.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version