Home बातम्या एपीआय विदर्भ : नवी कार्यकारिणी

एपीआय विदर्भ : नवी कार्यकारिणी

0

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (एपीआय) विदर्भ शाखेचा २०२६-२७ या वर्षासाठीचा प्रतिष्ठापना सोहळा नुकताच नागपूर येथे उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात एनकेपी साल्वे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रातील औषधवैद्यक विभागाच्या प्रमुख डॉ. तनुजा मनोहर यांनी एपीआय विदर्भ शाखेच्या २२व्या अध्यक्षा म्हणून तर पदभार डॉ. अश्विनी तायडे यांनी मानद सचिव म्हणून पदभार स्वीकारला. तसेच नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचाही पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते व ‘सर्च’, गडचिरोलीचे संचालक उपस्थित होते.मान्यवर अतिथी म्हणून एपीआय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. निखिल बालंखे तसेच एपीआय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व महा-जापीचे मुख्य संपादक डॉ. मंगेश तिवसकर उपस्थित होते.

प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी एमएमसी मानांकन प्राप्त सतत वैद्यकीय शिक्षण (CME) कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यानंतर नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. तनुजा मनोहर यांनी “अक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअर : सद्यस्थितीतील संकल्पना” या विषयावर अध्यक्षीय व्याख्यान दिले.

प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी “आरोग्य स्वराज्य” या विषयावर विशेष व्याख्यान देत आरोग्य क्षेत्रातील स्वावलंबन, लोकसहभाग आणि सार्वजनिक आरोग्य याविषयी मोलाचे विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राखी जोशी आणि डॉ. विम्मी गोयल यांनी केले, तर नवनिर्वाचित मानद सचिव डॉ. अश्विनी तायडे यांनी आभार मानले.

दुपारी ३ ते ४ या वेळेत “बदलती जीवनशैली आणि आजार” या विषयावर विशेष लोकसंवाद आयोजित करण्यात आला. या चर्चासत्राचे समन्वयन डॉ. अश्विनी तयाडे आणि डॉ. गिरा सोनी यांनी केले. डॉ. मंगेश तिवसकर, डॉ. शंकर खोबरागडे, डॉ. तनुजा मनोहर, डॉ. मंजुषा मरडीकर आणि डॉ. शिल्पा देवके यांनी जीवनशैलीजन्य आजारांचे प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

“नवी कार्यकारिणी”
अध्यक्षा : डॉ. तनुजा मनोहर
माजी अध्यक्ष : डॉ. जयराज कोरपे
उपाध्यक्ष : डॉ. नितीन वडस्कर, डॉ. सुधीर चाफळे
मानद सचिव : डॉ. अश्विनी तायडे
माजी सचिव : डॉ. जयेश तिमाने
कोषाध्यक्ष : डॉ. अभिषेक पांडे
संयुक्त सचिव : डॉ. अजय बुल्ले, डॉ. पारस झुनके
वैज्ञानिक समिती प्रमुख : डॉ. मंजुषा मारडीकर
सहप्रमुख : डॉ. मेघा बालंखे, डॉ. शिल्पा देवके
कार्यकारिणीमध्ये : डॉ. अपूर्वा कोलते, डॉ. अरविंद अग्रवाल, डॉ. भूषण इटकलवार, डॉ. गिरा सोनी, डॉ. जितेश जेसवानी, डॉ. किरण बेलसरे, डॉ. पराग रहाटेकर, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. प्रशांत गोवर्धन, डॉ. प्रवीण पंत, डॉ. राजश्री खोत, डॉ. राखी जोशी, डॉ. रिया बल्लीकर, डॉ. सलील गानू, डॉ. समीर लोटे, डॉ. संकेत पेंडसे, डॉ. शिल्पा कुठे, डॉ. सिद्धार्थ धांडे, डॉ. सुनंदा चावजी, डॉ. स्वप्ना खानझोडे, डॉ. वंदना आदमाने, डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. विश्वास दशपुत्र यांचा समावेश आहे.

समारोपप्रसंगी एपीआय विदर्भ शाखेने विदर्भातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version