Sunday, February 1, 2026
Homeसाहित्यअंतरीचे गुज

अंतरीचे गुज

अंतरीचे गुज
अंतराने जाणावे
अंतराचे अंगणी
सदा माहेर साठवावे

बारा बैलांची जोडी
लखलाभ तुझी तुला
काळी कपिला गाय
दादा आंदण द्यावी मला

दिवाळीची चोळी फाटून
एक दिवस होईल चिंधी
शेतामध्ये उभे
उद्या कपिलेचे नंदी

आंदण असं माहेराचं
दिसामाजी वाढावं
गाई गुरांनी रे दादा
तुझं गोठं सदैव भरावं

बहीणभावाच नातं आपुलं
असं अंतरी फुलाव
आईबापाच्या माघारी
बंधू तूच आम्हांवरी
मायेच छत्र धरावं

आशा दळवी

– रचना : आशा दळवी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9