कवयित्री प्रिती प्रवीण रोडे, यांनी पुढील कविता मुळात त्यांच्या आईचे निधन झाल्यावर लिहिली होती. परंतु नुकतेच त्यांच्या आईसमान, सासूबाईंचे निधन झाले आणि त्यांच्या लक्षात आले की, आपल्या आईसाठी लिहिलेली कविता आपल्या सासूबाईंनाही तंतोतंत लागू पडते !
वाचू या ही कविता…
– संपादक
निघून गेलीस तू
अनंताच्याही पलीकडे
हिरावून आमची विसाव्याची कूस
तुझं जाणं अंतर्मन हादरवून गेलं
अगदी खोल सात्विकतेची ठेव जपणारे
तुझे ते दोन हात
जगण्याचं बळ देणारी
तुझी धडपड त्या पंखांच्या ऊबेनी
पडू नाही दिली भ्रान्त
पण आज भासतेय उणीव
तूझ्या अस्तित्वाची
तूझ्या चिन्मय स्पर्शाची
एक मोठ्ठ स्थित्यंतर येऊन गेलंय
आज सगळं तेच आहे
मीही तीच आहे
पण, पण, तू कुठे आहेस ?
कळतंय मला
तु ही आहेस जवळ
तू आहेस जवळ
माझ्या अंतर्मानात
त्या “अक्षय्य” स्मितासह
— रचना : प्रिती प्रवीण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
भावली कविता. सासुबाईंवर कविता हा अनुभव
दुर्मिळ. धन्यवाद अ रोडे मॅम
धन्यवाद