ठाणे येथे नुकत्याच झालेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात मेघना साने लिखित “अज्यात मज्यात पिंटूच्या राज्यात” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुलांच्या कल्पकतेची नस शोधून लिहिणं हे सोपे नाही. मुलांसाठी सकस साहित्य निर्माण करून बालसाहित्याला नवा आयाम देण्याचे काम मेघना साने यांनी केले आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अशोक चिटणीस म्हणाले.
तीन दिवस संपन्न झालेल्या या महोत्सवात व्यास क्रिएशन्स प्रकाशित ८ पुस्तकांचे प्रकाशन झाले.
पुस्तक आदान प्रदान महोत्सव
“आपण वाचलेले आणि संग्रही असलेले पुस्तक दान करा आणि तुम्हाला आवडेल ते पुस्तक घेऊन जा” या संकल्पनेवर आधारित तीन दिवसांच्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचे आयोजन व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष होते. ज्येष्ठ कलावंत पदमश्री नयना आपटे, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आणि ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
वाचन हा उत्तम संस्कार आहे, तो पुस्तकांच्या रूपाने जपला जातो. पुस्तकांचे आदान प्रदान म्हणजे विचारांची देवाण घेवाण असते. आपला समाज चांगल्या विचारांनी, उत्तम संस्कारानी समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचे आदान प्रदान महत्त्वाचे आहे, असे अशोक समेळ यांनी सांगितले.
यावेळी पदमश्री नयना आपटे आणि विजय गोखले यांची प्रकट मुलाखत वृंदा दाभोळकर यांनी घेतली.
या महोत्सवात वाचन, अभिवाचन, नाट्यप्रवेश. मान्यवरांची व्याख्याने याची मेजवानी रसिक वाचकांना मिळाली.
– टीम एनएसटी. 9869484800
अज्यात मज्यात पिंटूच्या राज्यात नाव मला खूप आवडले,लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकासाठी आपले खूप खूप अभिनंदन
मेघना साने यांचे अभिनंदन!!