‘आनंदपीठ’च्या वतीने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात, कोळवण खोर्यातील भालगुडीमध्ये ‘आनंदपीठ’च्या वतीने नुकतेच एक निवासी शिबिर झाले.
या शिबिरात महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यांतून १३ ते १९ या वयोगटातील ६० मुले-मुली सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोन्हींची संख्या समसमान होती !

या शिबिरात सर्वश्री सोनम वांगचुक, अतुल पेठे, डॉ. हमीद दाभोलकर, संभाजी भगत, संजय आवटे, सर्फराज अहमद, शाहू पाटोळे, अरूण शर्मा अशा दिग्गजांसह अनेक नामवंत आले होते. त्यांनी मुला-मुलींशी गप्पा मारल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह ही अगदी आवर्जून आले होते.

भयंकर पाऊस असूनही, हे शिबिर सलग आठ दिवस खूप छान पद्धतीने झाले. शिबिरात कोळवण खोर्यातले आणि मुळशी परिसरातले सात विद्यार्थीही होते.
त्यानंतर कोळवण खोर्यातील मुला-मुलींसाठीही घेण्यात आलेल्या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे आवर्जून आल्या.
नव्या पिढीला ‘आयडिया ऑफ इंडिया’ कळावी यासाठी सतत काम करण्याचा आनंदपीठाचा मानस आहे. प्रेम आणि समतेवर उभं राहिलेलं आनंदी जग साकारण्यासाठीची ही पेरणी आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800