Thursday, November 21, 2024
Homeसेवाअभिनव टपालदिन

अभिनव टपालदिन

स्वित्झर्लंडमध्ये 1874 मध्ये सुरू झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) च्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक टपालदिन 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. लोकांना जगभरातील इतरांना पत्रे पाठवण्यास सक्षम करून जागतिक संप्रेषण क्रांतीमध्ये UPU ने महत्त्वाची भूमिका बजावली. जागतिक टपाल दिनाची स्थापना 1969 मध्ये झाली आणि तेव्हापासून जगभरातील देश टपाल सेवांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात..

असाच एक अभिनव उपक्रम छ्त्रपती संभाजीनगर येथील भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मोहल्ला बालवाचनालय आणि अलहुदा उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाल वाचनालयाच्या 500 सदस्यांना पोस्ट कार्ड वाटून त्यांना त्यांच्या आवडत्या पुस्तकाबद्दल आणि लोकप्रिय पुस्तकाच्या लेखकांच्या बाबतीत लिहायला सांगितले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नर्गिस शेख, नसरीन कादरी व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

रीड अँड लीड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले की, या वर्षाच्या सुरुवातीला देखील फाउंडेशनच्या माध्यमातून 25,000 पोस्ट कार्ड, शहरातील उर्दू शाळा आणि सध्या सुरू असलेल्या मरियम मिर्झा मोहल्ला बाल ग्रंथालय मोहिमेतील 30 बाल ग्रंथालयांच्या सदस्यांनी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठीत पोस्टकार्डे लिहिली होती.

खरोखरच छ्त्रपती संभाजीनगर येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम अनुकरणीय असून इतर संस्था, शाळांनी देखील शालेय विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची, वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून असे अभिनव उपक्रम राबविण्याची नितांत गरज आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. टपाल खात्यासबंधित बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
    आजच्या युगात हे खाते दुर्लक्षित झालेले आहे. पोस्टमनच्या येण्याने होणारा आनंद आता क्वचितच मिळतो. या खात्याबाबत मला विशेष जिव्हाळा आहे. पुनःच एकदा धन्यवाद.

  2. मुस्लिम मुलांनी टपाल दिनानिमित्त आयोजित केलेला उपक्रम निस्चितच अभिनंदनीय आणि इतरांसाठी अनुकरणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments