Home बातम्या अरुण पौडवाल पुरस्कार हेमंत पारकर यांना प्रदान

अरुण पौडवाल पुरस्कार हेमंत पारकर यांना प्रदान

0

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार  स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ, संगीत क्षेत्रातील व्यक्तींना दरवर्षी “कृतज्ञता गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये –
51,000/- असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी म्हणजेच 25 वे वर्ष आहे.

सुप्रसिद्ध ध्वनिमुद्रक  श्री. हेमंत पारकर यांना
यंदाचा पुरस्कार स्व.अरुण पौडवाल यांच्या जन्मदिनी, म्हणजेच काल 9 मे रोजी पुरस्काराच्या आयोजक, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या मुंबईतील घरी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पौडवाल, पारकर कुटुंबिय, आप्त, स्नेही उपस्थित होते.

अल्प परिचय
ध्वनिमुद्रक श्री. हेमंत पारकर यांची 1982 पासून ते आत्ता पर्यंत रेकॉर्डिस्ट म्हणून 40 वर्षांची प्रदीर्घ व उल्लेखनीय कारकीर्द  आहे. ती अशी :-
1982 ते 1984 : मेहबूब स्टुडिओ मध्ये सहायक
1985 ते 1993 : श्री साउंड स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिस्ट
1993 ते 2008 : सुदीप स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिस्ट
2008 ते 2010 : फ्री लान्स काम
2011 ते 2019 : डी.आर. मल्टिमीडिया
2019 ते आतापर्यंत : ग्राव्हिटी स्टुडिओ मध्ये कार्यरत.

श्री. हेमंत पारकर यांनी, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, मेहदी हसन,  किशोरकुमार, सोनू निगम, पंकज उदास, सुदेश भोसले अशा नामवंत गायक व कल्याणजी – आनंदजी, अरुण पौडवाल, अनिल मोहिले,  लक्ष्मीकांत – प्यारेलाल, भप्पी लाहिरी, रवींद्र जैन, अनु मलिक, राजकमला, राम लक्ष्मण अशा श्रेष्ठ संगीतकारांबरोबर  शेकडो गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत.

आजवर या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर :-
संगीतकार राम कदम, पार्श्वगायक जी.मल्लेश, संगीतकार यशवंत देव, प्रभाकर जोग,  दत्ता डावजेकर, अशोक पत्की,  संगीत संयोजक श्यामराव कांबळे,  तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, भावगीत गायक अरुण दाते, गिटार वादक रमेश अय्यर, ध्वनिमुद्रक डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर, सत्येन पौडवाल, युवा गायक गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे.

या पुरस्काराबद्दल श्री हेमंत पारकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version