आपल्या मनातील भावना
प्रेम, राग, द्वेष, असो वा काही
जी हळूवार व्यक्त करते
ती सुंदर नजाकतीची ललना
अशी अलकाताईची गणना !१!
केशरचना मोहक जिची
सदा हास्य विलसे चेहऱ्यावर
“अलका” जिचे नावच दर्शविते
विश्वास आपल्या कामावर !२!
एमटीएनएलच्या नोकरीने,
आली संसारात स्थिरता
जीवाभावाचे नाते जुळले
अनेक मैत्रिणींमध्ये एकता !३!
कॅन्सर सारखी व्याधी
अवचित नशीबी आली
न घाबरता न डगमगता
मात त्यावरती केली !४!
या व्याधीची घेऊन दखल
“कॉमा” हे उत्तम पुस्तक लिहिले
आत्मविश्वासाने सामोरे जा
असे संदेश व्याधीग्रस्तांना दिले !५!
सेवानिवृत्तीपरांत ही आहेत व्यस्त
जीवन जगताहेत मस्त
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर
आपल्याला भेटतात जास्त !६!
रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800