थोर व्यंगचित्रकार, सध्या पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्याचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती. मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारे असा सरग यांचा नाव लौकिक होता. त्यांच्या निधनामुळे माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
व्यंगचित्रकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सरग हे खप मनस्वी व पत्रकारांच्या कामावर बारकाईने वप्रेमाने लक्ष ठेवणीरे दुर्मीळ शासकीय अधिकारी होते.त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर कायमच त्यांचे स्मरण करून देत राहील.त्याच्या आत्म्याला नक्कीच सद्गती मिळाली असेल.त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली.