Friday, November 22, 2024
Homeबातम्याअसेही पर्यावरण प्रेम

असेही पर्यावरण प्रेम

नवी मुंबईतील थोरवे परिवार तसेच त्यांची मित्र मंडळी दरवर्षी वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण करीत असतात. त्यांचे
हे आठवे वर्ष आहे. आतापर्यंत त्यांनी 2000 च्या वर वृक्षारोपण केलेले आहे. वाचु या, या वर्षीच्या वृक्षारोपणाचा वृत्तांत…
– संपादक

पर्यावरणाचा ढासळलेला तोल सांभाळण्याचा प्रयत्न आज विविध पातळ्यांवर होत आहे. जुलै महिन्यात साजरा होणारा वन महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे.

पर्यावरण संवर्धनाचा एक भाग म्हणून नवी मुंबई येथील सुधीर थोरवे आणि त्यांचा परिवार, स्नेही, सहकारी मागील कित्येक वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करत आहेत.

मागील आठ वर्षापासून त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत. आपल्या मित्रमंडळींना एकत्र घेऊन ते वनविभागाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत दोन हजारापेक्षा जास्त वृक्षांची लागवड केलेली आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 29 जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील वांजळे येथील वन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वय वर्ष नऊ ते पासष्ट वयोगटातील मंडळींनी एकत्रित येऊन कौटुंबिक वातावरणात जवळजवळ दीडशे वृक्षांची लागवड केली.

आपल्या दैनंदिनी कामकाजातून बाहेर पडून कुदळ, फावडीने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदताना प्रत्येक जण आपापल्या परीने श्रमदान करीत होते. हिरवेगार गालिचे पांघरलेला परिसर, सभोवतालील डोंगरांच्या 🏔️ 🏔️ रांगा, त्यामधून वाहणारे धबधबे, खाली आलेले ढग ☁️,अधून मधून येणाऱ्या पावसाच्या 🌧️ सरी अशा निसर्गरम्य वातावरणात या समूहाने वृक्षांची लागवड केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांनी केलेले श्रमदान आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेला प्रयत्न याचा आनंद दिसत होता. वनाधिकारी तसेच कर्जत मधील शरद पवार व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.

वृक्ष लागवडीनंतर श्रमदानाचा थकवा घालवण्यासाठी ग्रुपमधील बऱ्याच जणांनी शेजारी खळखळ वाहणाऱ्या नदीच्या 🌊 निखळ प्रवाहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.

वनभोजन करताना चंद्रकांत आणि संगीता यांनी आपल्या गाण्यांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. वनभोजनाची 🍽️ व्यवस्था वैशाली, शैला, सरिता आणि विलास यांनी चोखं बजावली.

प्रथमेश, सर्वेश, 💪 श्रेया, अनन्या, मैत्री, सान्या श्रेयस, आयुषी या यंग ब्रिगेडरने या वृक्ष लागवडीसाठी फार मेहनत घेतली. तसेच आपल्या कुटुंबासमवेत आलेले शेखर पडते, येवले, पेडणेकर, महामुनी, मनीषा, आतिश, अजय, अनिल, रवी, चेतन हितेश, प्रशांत, जयेश, निलेश ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद दिसत होता.

पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी एक केलेला छोटासा प्रयत्न या सगळ्यांनाच एक आगळं वेगळं समाधान देऊन गेला.

  • — टीम एनएसटी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments