मी पूनर्जन्माविषयी ऐकले होते. पण आज मलाच दुसरा जन्म मिळाला तो केवळ नांदेड येथील भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुळेच.
मी गजानन बसवराज साताळे, २५ वर्षिय तरुण नांदेड जिल्ह्यातील मुखेडचा रहिवासी आहे. मला २० दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला मी होम कोरोंटाईन होऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले पण माझा त्रास वाढत गेला.
पाच दिवसांनंतर मला दम लागायला सुरुवात झाली. डॉक्टरांकडे मुखेडला आँक्सिजन तपासणी केली असता आँक्सिजन ६० असल्याचे कळाले व वेंटिलेटर बेड पाहिजे म्हणून नांदेडला जावे लागेल म्हणून डॉक्टरांनी सांगितले.
आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाची प्रकृती गंभीर आहे हे कळताच माझ्या आई बाबांच्या अंगात जीव नसल्यासारखा झाला. खुप सारे प्रश्न घेऊन आम्ही अँम्बुलन्सने ऑक्सिजनसह नांदेडला रवाना झालो.
खुप हाॅस्पिटल मध्ये विनंत्या केल्यावरही बेड मिळेनासा झाला. तेंव्हा आम्ही भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आलो.
डॉ. व्यंकटेश डुब्बे साहेबांनी माझी तपासणी केली. सिटीस्कॅन केला. सिटीस्कॅन स्कोअर २० आहे, प्रकृती गंभीर आहे असे सांगितले. रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नव्हता. पण माझ्या आई वडिलांचा रडवा चेहरा पाहून व त्यांच्या विनंतीला मान देऊन डॉ व्यंकटेश डुब्बे साहेबांनी मला रुग्णालयात भरती करून ईमरजन्सी रूममध्ये ऑक्सिजन लावून उपचार सुरू केले.
पाच तासानंतर मला आयसीयूमध्ये दाखल केले व बायपॅप वेंटिलेटर लावण्यात आले. मला थोड्याच वेळात आराम वाटला व ऑक्सिजन ९२ पर्यंत वाढला . डॉक्टरांनी मला व माझ्या परिवाराला खूप धीर दिला.
मी १० दिवस वेंटिलेटरवर कोरोनाशी लढा दिला. दहाव्या दिवशी वेंटिलेटर निघाले व नंतरच्या १० दिवसात ऑक्सिजन पण बंद झाला.
भगवती हाॅस्पिटलचे डॉ अंकुश देवसरकर, डॉ राहूल देशमुख, डॉ व्यंकटेश डुब्बे, डॉ श्रीनिवास संगनोर व भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व टिम यांच्यामुळेच मी आज सुखरूप माझ्या घरी मुखेडला परतलोय. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
डॉ व्यंकटेश डुब्बे साहेबांनी व पूर्ण भगवती टिमने माझ्यासारख्या असंख्य गंभीर रूग्णांचे प्राण वाचविले हे मी स्वतः २० दिवसामध्ये भगवती रुग्णालयात पाहिले.
मी, ही कोरोना सोबतची लढाई देवाचे आशिर्वाद, आई वडिलांचे प्रेम, डॉक्टरांचे प्रयत्न, स्वतःवरचा विश्वास या सर्वांमुळे जिंकली.
माझी ही कथा माझ्यासारख्या अनेक रुग्णांना प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा करतो.
– लेखन : गजानन साताळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Nice article