नगर जिल्ह्यातील ‘संगमनेर तालुक्यातील खळी गावात रेवुबाई सखाराम वाघमारे यांचे नुकतेच वृध्धापकाळाने निधन झाले.
बौद्ध धर्माच्या नियमानुसार अग्नि संस्कारानंतर अस्थींचे विसर्जन तीर्थक्षेत्री नदीत न करता आईच्या नावाने राहत्या घरासमोर एक आंब्याचे झाड लावुन त्याच्या बुंध्यास अस्थींचे विसर्जन करण्याचा निर्णय त्यांच्या सहा मुलांनी व नातलगांनी एकमताने घेतला. या कृतिमूळे पाण्याचे प्रदुषण टाळून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी एक नवीन पायंडा पाडून समाजास नवी दिशा देण्याचे कार्य घडले आहे,’ असे प्रतिपादन बौधाचार्य अशोक गायकवाड यांनी पुण्यानूमोदन कार्यक्रमात केले.
यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, आसान अपंग संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे, तेरेजा भिंगारदिवे, कासा संस्थेचे सुनिल गायकवाड, बाळासाहेब साळवे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एन जी ओ (मँगो) चे सचिव प्रसाद भडके इ मान्यवर उपस्थित होते. मातोश्रींच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला
कार्यक्रम यशवितेसाठी पांडूरंग वाघमारे, शिवाजी कदम, तान्हाजी कदम, रावसाहेब वाघमारे, उल्हास वाघमारे, सुधाकर वाघमारे, नंदू वाघमारे, डॉ. रमेश वाघमारे, सुरेश वाघमारे, आर. पी. आय उत्तर महाराष्ट्र सचिव किशोर वाघमारे व खळी गावचे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी परिसरातील मान्यवरांसह लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800