आज आपल्या काव्य मैफलीत स्वागत करू या, सातारा येथील बाल कवयित्री मृण्मयी धीरज कुंदप हिचे. मृण्मयी सध्या सातवीत शिकत असून तिची “आई” ही कविता पुढे देत आहे. मृण्मयी चे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
रोज म्हणते स्वतःला
आज म्हटलं विचारून पाहू तुम्हाला
कधी दिलाय का तेवढा मान मायला
जेवढं प्रेम केले तिने तुमच्यावरी
आई म्हणते तुम्हाला
काय करू रात्री जेवायला
कधी तुम्ही सांगितले का तिला,
कर तुझ्या आवडीचं काहीतरी
तुम्ही खाता ताजी गरम पोळी
पण आई मात्र खाते,
कालची शिळी पोळी
तिला वाटते कळत नाही कोणालाही काही
अशी ही साधी भोळी माझी आई
म्हणून म्हणतात…
आई या शब्दाचा अर्थ लिहिण्यासाठी
आभाळा इतका कागद,
अन् समुद्रा इतकी शाई
देखील पुरणार नाही

— रचना : मृण्मयी धीरज कुंदप. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800