काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० दोन वर्षांपूर्वी रद्द झाले. देशभर जल्लोष झाला. या जल्लोषातूनच नीला बर्वे यांना उस्फूर्तपणे सुचलेली ही कविता…..
कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमी
महासागर आकाशी उंच झेपावला
झेलीत तुषार सुखावे
हिमालय प्रथमच आनंदें हसला !
गंगेचा उगम प्रभावित झाला
हर्षित होऊनी,गिरक्या घेत
साऱ्या नद्यांची भेट घेऊ लागला !
सूर्य आज अस्तास जाण्यास विसरला
की न राहवून चंद्र लवकर उगवला ?
असो काहिही, पण
दोघेही नभी, मणिकांचनयोग लाभला !
चांदण्यांनी ठुमकत भोवती फेर धरला
ढगांनी घेतली गगनी रांगोळी रेखाटया
बघता बघता नभीं तिरंगा साकारला !
उल्हसित सारे एकदिलाने म्हणती
आज भारत अखंड जाहला
खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला !!

– रचना : नीला बर्वे. सिंगापूर
Great