आठवणी झुलत असतात
मनाच्या झुल्यावर
हलकेच एक झुळूक येते
पानाच्याच्या हळव्या देठावर..
मी हळूच फुंकर मारते
अन् दवबिंदू चे डोळे
ओलावतात आठवणीने…
मी अशीच..
माझ्यात रमणारी
पावसाला निरखत
स्वतःच थेंब होणारी

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800