Wednesday, June 18, 2025
Homeबातम्याआडकोजी महाराजांच्या कार्याला उजाळा मिळावा - देवेंद्र भुजबळ

आडकोजी महाराजांच्या कार्याला उजाळा मिळावा – देवेंद्र भुजबळ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरू असलेल्या संत आडकोजी महाराजांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आणि १०० व्या पुण्यतिथी निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली. ते
आडकोजी महाराजांचे २५ वर्षे वास्तव्य असलेल्या वर्धा जिल्ह्यातील दहेगाव मुस्तफा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी १०० वर्षानी समाधी घेतल्याचे आडकोजी महाराजांचे एकमेव उदाहरण असून तुकडोजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या आडकोजी महाराजांचे प्रगत विचार आजच्या काळात सर्वांपुढे प्रभावीपणे पोहोचण्यासाठी परिसंवाद, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने, पुस्तक प्रकाशन, माहितीपट अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येण्यासाठी अखिल भारतीय कासार समाज मंडळाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना श्री भुजबळ यांनी केली. आपण लिहिलेल्या “समाजभूषण” पुस्तकाचा उद्देश समाजातील यशवंतांचे कौतुक करून त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी हा असल्याचे सांगून त्यांनी आपण स्वतः समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले. यावेळी “समाजभूषण” चे विदर्भ विभागीय प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना आमदार दादाराव केचे यांनी आडकोजी महाराजांच्या कार्याची महती विशद करून दहेगाव मुस्तफा येथे आडकोजी महाराजांचे मंदिर होण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

अखिल भारतीय कासार समाज मंडळाचे अध्यक्ष श्री शरद भांडेकर यांनी मंडळाच्या वाटचालीचा आढावा सादर करून समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करीत राहु असें सांगितले.

विदर्भ कासार मंडळाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजक श्री अनिल नागपूरकर यांनी मंडळाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून पुढील काळात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुनील काटेकर यांनी केले.

या कार्यक्रमास विविध ठिकाणाहून आलेले विविध मान्यवर, समाज बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी आडकोजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.

– टीम एनएसटी 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?