Homeसाहित्यस्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

त्यागिले तयानी स्वजीवन
घेऊनी स्वराज्याची आण
वाढवूनी गे स्वतःची शान
समर्पिले हो आपुले प्राण..1

पडले धारातिर्थी बहुजन
होऊनी नतमस्तक सर्वजण
करुनिया अविरत वंदन
स्वभूमीस कित्येकजण. 2

जाज्वल्य काव्य प्रसवले
तैल बुद्धीमत्तेचा शूरवीर
कागद ना लेखणी शिवाय
कारागृहाच्या भिंतीवर.. 3

लेखणी त्यांची, विचार जहाल
अन्यायाची पेटवी मशाल
अशा देशभक्ताचा आपण
करू या जयजय सन्मान..4

सावरकर ते येथे जन्मले
त्याग करुनी वाढवूनी शान
जुंपून घाण्यास हाल झाले
वीर होऊनी जाहले महान.. 5

अनादी अनंत, महान कार्य
मारता शत्रूस, झुंझुनी मरेन
वाणी लेखणीसह जीवन सार्थ
थोर वीरास शतशः नमन.. 6

मीना घोडविंदे

— रचना : सौ.मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना आदरांजली अर्पण करणारा सुंदर विशेषांक. त्यांना शतशत वंदन 🙏🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 2
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 2
प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2